वसईत अजब गोंधळ, बाप्पासोबत साडेपाच तोळं सोन्याच्या मुकूटाचंही 'विसर्जन'!
वसईत अजब गोंधळ, बाप्पासोबत साडेपाच तोळं सोन्याच्या मुकूटाचंही 'विसर्जन'!Saam Tv

वसईत अजब गोंधळ, बाप्पासोबत साडेपाच तोळं सोन्याच्या मुकूटाचंही 'विसर्जन'!

१२ तासांच्या शोधानंतर पाटील कुटुंबीयांचा मुकूट सापडला.

वसई - राज्यात शनिवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. वसईत दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनावेळी एका कुटुंबाकडून एक चूक झाली. पण गणपती बाप्पाने जाता जाता पाटील कुटुंबीयांसमोरचे हे 'विघ्न' दूर केले आहे. पाटील कुटुंबीयांचा दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करताना साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मुकूट हरवला होता. बाप्पांचे विसर्जन करताना सोन्याचा मुकूट देखील पाटील कुटुंबीयांकडून चुकून विसर्जित झाले. पण १२ तासांच्या शोधानंतर पाटील कुटुंबीयांचा मुकूट सापडला.

हे देखील पहा -

वसईतील पाटील कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे यंदाची उत्साहात बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. पण घरी सुतक पडल्याने पाच दिवसांच्या बाप्पाचे दीड दिवसात विसर्जन करण्यात आले. विसर्जन करताना घाईघाईत साडेपाच तोळ्याचे सोन्याचे मुकूट देखील चुकून विसर्जित झाला होता. या मुकुटाची किंमत जवळपास तीन लाख रुपये इतके असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाप्पाचे मुकूट सापडला आणि बाप्पा पावल्याचे समाधान पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com