वसंत मोरे अन् आघाडीचे नेते एकाच मंचावर; रोहित पवार कानात, म्हणाले...

आज पुण्यात मनसेचा शहर मेळावा पार पडत आहे. त्या कार्यक्रम पत्रिकेत...
Vasant More - Rohit Pawar
Vasant More - Rohit Pawar Saam TV

पुणे: पुणे शहराचे मनसेचे माजी अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) मागच्या अनेक दिवसांपासून पक्षातून साईड-लाईन झालेले पाहायला मिळत आहेत. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदीवरील भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. वसंत मोरेंना जवळपास सर्वच पक्षातून पक्षात घेण्यासाठी फोन आले परंतु मोरे 'मी तर राज साहेबांचाच सैनिक' म्हणत पक्षाशी एकनिष्ठ राहिले.

पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार आयोजीत केला होता. तिथे सगळेच महविकास आघाडीचे नेते होते. त्यावेळी वसंत मोरे यांच्या शेजारी रोहित पवार (Rohit Pawar) बसले होते. रोहित पवारांनी कानात काय सांगितले असा प्रश्न विचारला असता वसंत मोरे म्हणाले 'तुम्ही एक गोष्ट चांगली केली की तुम्ही मनसेत राहिलात'. संबंधित पुरस्कार हा मी केलेल्या कामाचा होता. संजय जगताप, सुप्रिया सुळे यांनी सगळ्यांनी माझ्या कामाची चर्चा केली असे वसंत मोरे म्हणाले आहेत.

Vasant More - Rohit Pawar
TET Exam Scam: टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रितिश देशमुखला जामीन मंजूर

मनसे मेळाव्याच्या कार्यक्रमातून मोरेंचे नाव वगळले

आज पुण्यात मनसेचा शहर मेळावा पार पडत आहे. त्या शहर मेळाव्याला वसंत मोरे हजर राहणार का असा प्रश्न होता. त्यावर वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी आज शहर मेळाव्यात जाणार का नाही याचा निर्णय घेतला नाही. माझ्या हातात रात्री १२.३० वाजता कार्यक्रम पत्रिका आली. त्या कार्यक्रम ११ जणांची कोर कमिटी आहे पण पत्रिकेत १० जणांचीच नावं आहेत. माझं नाव त्यात नाही असा वसंत मोरे म्हणाले आहेत.

आजचा विषय मुद्दाम केला गेला आहे. याच्यापासून मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनात राग निर्माण झाला पाहिजे म्हणून हे चालू आहे असेही वसंत मोरे म्हणाले आहेत. साहेबांपर्यंत पोहचवले नाही ही गोष्ट पण शहरात ज्या सिनियर लोकांना मी मानतो त्या लोकांपर्यंत मी हे पोहचवला आहे. राज साहेबांच्या मागे बरीच कामं आहेत या असल्या चिल्लर गोष्टींसाठी त्यांना नाही असे वसंत मोरे म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com