महाआरतीनंतर वसंत मोरेंचा थेट मुस्लीम पदाधिकाऱ्याच्या घरी जेवनाचा बेत

वसंत मोरे यांनी पुण्यामध्ये महाआरतीचे आयोजन केले होते.
महाआरतीनंतर वसंत मोरेंचा थेट मुस्लीम पदाधिकाऱ्याच्या घरी जेवनाचा बेत
Vasant MoreSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: वसंत मोरे यांनी पुण्यामध्ये महाआरतीचे आयोजन केले होते. राज ठाकरे पुण्यामध्ये असूनही वसंत मोरे यांच्या महाआरतीला उपस्थीत राहिले नव्हते. आता वसंत मोरे यांनी महाआरतीनंतर मुस्लीम पदाधिकाऱ्याच्या घरी जावून जेवन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पुणे शहर सरचिटणीस आवेज शेख यांच्या जावून वसंत मोरे (Vasant More) यांनी जेवनाचा आस्वाद घेतला. मनसेचे इतर कार्यकर्तेही मोरेंच्या सोबत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या माशिदीवरील भोंग्या विरोधी आंदोलनानंतर, मनसे नेते वसंत मोरे यांनी ईद साजरी केली आहे. मुस्लीम पदाधिाऱ्यांच्या भेटीचे फोटो वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक फेजवर शेअर केले आहेत.

दरम्यान राज्याच्या राजकारणात भोंग्याचा मुद्दा सध्या धुमाकूळ घालताना दिसतोय. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेसह त्यानंतर घेतलेल्या दोन्ही सभेत हाच मुद्दा रेटून धरल्याचे पाहावयास मिळत आहे. मुस्लिम समाजाशी निगडित असलेल्या या मुद्द्याला हात घातल्यानंतर मनसेमध्ये सक्रिय असणारे अनेक मुस्लिम पदाधिकारी पक्षास जय महाराष्ट्र करत पक्षातून बाहेर पडले. राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम राज्यातील सर्व मशिदीच्या मौलवींना तसेच राज्यसरकारला दिला होता. दरम्यान, भोंगे हटवले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व मनसैनिकांना दिले होते.

Vasant More
संजय राऊतांवर आठ दिवसात गुन्हा दाखल करा नाहीतर...; सोमय्यांचा इशारा

राज ठाकरेंची हीच भूमिका प्रत्यक्षपणे मुस्लिम समाजाविरोधात असल्याने पक्षाच्या या भूमिकेस आपले समर्थन नसल्याची भूमिका पुण्यातील मनसेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी घेतली. तसेच मला आपल्या प्रभागात शांतता हवी असल्याचेही मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले होते. पक्षाच्या भूमिकेस डावलल्याने वसंत मोरेंचे पुणे शहराध्यक्ष पद काढून टाकण्यात आले. यानंतर मोरेंसह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.