Prakash Ambedkar : महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी मुळीच इच्छा नाही; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.
Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi
Prakash Ambedkar on Mahavikas AaghadiSaam TV

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीचा भाग होण्याची आमची मुळीच इच्छा नाही. आमची युती शिवसेनेशी (ठाकरे गट) आहे. जागावाटपावरून आमच्यामध्ये (उद्धव ठाकरे) चर्चा झाली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi
Jayant Patil : राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यांवरून जयंत पाटलांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले,एकही मायचा लाल...

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आज पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी आमची महाविकासआघाडीचा भाग होण्याची मुळीच इच्छा नसल्याचं म्हटलं आहे.

नुकतीच प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत (ठाकरे गट) युती केली. त्यानंतर आज त्यांनी हे विधान केल्याने आगामी निवडणुकीत भीमशक्ती आणि शिवशक्ती महाविकास आघाडीचा भाग नसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सामील होण्याची आमची मुळीच इच्छा नाही, आमची युक्ती फक्त शिवसेनेशी आहे, मी आजही सांगतो आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र लढले आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू शकतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi
MLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं पोलिसांशी घातली हुज्जत, बाचाबाचीचा VIDEO व्हायरल

शिवसेना वादावर केलं भाष्य

प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (Shivsena) वादावरही भाष्य केलं. येत्या १४ फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी केस सुरू होण्याची शक्यता आहे. घटनेत असणाऱ्या अनेक गोष्टी अजूनही उघडकीस आल्या नाहीत. घटनेत पक्ष फुटीला स्थान नाही. जे काय निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतले आहेत. ते घेण्याचे त्यांना अधिकार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

'निवडणूक आयोगासमोरील सुनावणी बेकायदेशीर'

इतकंच नाही नाही तर, केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सध्या सुरू असलेल्या सगळ्या सुनावणी बेकायदेशीर आहेत. राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादावर निर्णय देण्याचे अधिकार फक्त विधानसभा अध्यक्ष यांनाच आहेत. राजकीय ओढून आणलेल्या सगळ्या केसेस सध्या आहेत. स्टे-ऑर्डरवर सरकार सुरू आहे, म्हणजे ही सुप्रीम कोर्टवर नामुष्की आहे, असंही ते म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com