
Pune By Election 2023 : चिंचवड पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीची डोके दुखी वाढवली आहे. वंचितने चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Prakash Ambedkar)
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पक्षांचं परिपत्रक जारी केलं आहे. राहुल कलाटेंना निवडून आणण्यासाठी वंचितकडून मतदारांना आवाहन करण्यात आलं आहे. चिंचवडमध्ये भाजपला केवळ कलाटेच थांबवू शकतात असा वंचितला विश्वास वाटतोय. मात्र वंचितने कसबा पोटनिवडणुकीबाबतच अद्याप निर्णय घेतलेला नाही. (Maharashtra Political News)
वंचितने पत्रकात काय म्हटलं?
पिंपरी चिंचवडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.
तेव्हा त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.
गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून भाजपला पिपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे.
वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.
वंचितने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं की, कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भात चर्चा झाली.कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय.
परंतु काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा असे विनंती पत्र आलेले नाही. आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.