'वेदांता' प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची एन्ट्री; शिंदे सरकारसह विरोधकांवर टीकास्त्र

काही जणांना साखर उद्योगा पलिकडे काही दिसत नाही - आंबेडकर
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजराजला जाण्यावरून राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. राज्य सरकारला या मुद्यावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे.

मात्र, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र, सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह महाविकास आघाडीवर देखील टीका केली आहे. एका सरकारने वेदांता प्रकल्पाबाबत तत्परतेने पाऊले उचलली नाहीत. तर काही जणांना साखर उद्योगा पलिकडे काही दिसत नाही. असं म्हणत त्यांनी सत्ताधारी शिंदे सरकारसह (Shinde Government) महाविकास आघाडीवरही टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ -

या प्रकल्पाबाबत तत्परतेने MOU करार का केला नाही, सरकारने या प्रोजेक्टचा क्लोजर रिपोर्ट का दिला नाही, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच साखर उद्योगाच्या पलिकडे कोणी विचारच करत नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com