खेडमध्ये रानभाज्या मोहोत्सव संपन्न

शहरातील नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशाने भिमाशंकर परिसरात भोमाळे येथे रानभाज्या महोत्सव
खेडमध्ये रानभाज्या मोहोत्सव संपन्न
खेडमध्ये रानभाज्या मोहोत्सव संपन्नरोहिदास गाडगे

खेड - पावसाळ्याच्या दिवसात सह्याद्री डोंगराच्या कुशीत भिमाशंकर परिसरात रानभाज्यांची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशाने भिमाशंकर परिसरात भोमाळे येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरीभागासह ग्रामीण भागातील नागरिकांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला.

आदिवासी भागातील रानभाज्या या भाज्यांची ओळख म्हणजे माड,कारटुले, चावावेल, पेरा, शेऊन लेथी यासारख्या चाळीसहुन अधिक जातीच्या रानभाज्या आहे,नक्कीच हि नावं आपण फार कमी ऐकली असेल पण या सा-या भाज्या १०० टक्के नैसर्गिक औषधी व पोषमुल्यांनी उपयुक्त असुन नैसर्गिक रित्या उगवुन येणा-या रानभाज्यांमध्ये विलक्षण असे गुणधर्म असतात,या रानभाज्यांची महिती आदिवासी बांधवांना परंपरेने असतेच.

हे देखील पहा -

या रानभाज्यांमधील काही भाज्या हंगामातुन एक दोन वेळा खाल्या की वर्षभर पोटाचं आरोग्य चांगलं रहाण्यास मदत होते रामकेळी हि खोकल्याच्या विकारावर उपयुक्त आहे सह्याद्री डोंगराच्या रांगातील भागात या भाज्यां मोठ्या संख्येने येत असतात मात्र या भाज्यांना योग्य बाजारपेठ व आदिवासी बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने या भाज्या दुर्लक्षीतच होत चालल्याची खंत येथील आदिवासी बांधव व्यक्त करत आहे.

रानभाज्यांपासुन तयार केलेल्या भाज्या पाहिलं तरी तोंडाला अगदी पाणीच सुटेल अशा पद्धतीचे हे मेनु तयार करण्यात आले. या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक या भाज्यांची चव चाखून पुढे जातो आदिवासी समाजाकडे असणारं निसर्गाचं देणं शहरी लोकांपर्यंत पोहोचवून आदिवासी बांधवांना काही प्रमाणात अर्थप्राप्ती होण्यासाठी पुण्यातील कल्पतरु संस्थेच्या पुढाकारातुन हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

खेडमध्ये रानभाज्या मोहोत्सव संपन्न
घरात किराणा नाही, पगारही नाही; बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

आदिवासी भाग म्हटलं की, नेहमीच त्याकडं दुर्लक्ष केलं जातं मात्र याच आदिवासी बांधवांकडे असणारं हे रानभाज्यांचं नैसर्गिक देणं दुर्लक्षीत करुन चालणार नाही यासाठी योग्य पद्धतीचे नियोजन करुन शहरीलोकांपर्यत पोहण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com