Vegetables Price : भाज्यांचे दर कडाडले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मार्केटमध्ये भाज्यांचे दर तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत.
Vegetables Price In Mumbai
Vegetables Price In MumbaiSaam Tv

भूषण शिंदे, साम टिव्ही मुंबई

Vegetables Price In Mumbai : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी एक चिंताजनक बातमी आहे. कारण, पेट्रोल-डिझेल, गॅस पाठोपाठ आता भाज्यांचे दर (Vegetables) कडाडले आहेत. लहरी पावसाचा शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच इंधन दरवाढीमुळे भाजीपाला महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री लागली आहे. (Vegetables Price List Today In Mumbai)

Vegetables Price In Mumbai
Gram Panchayat Election 2022 : ५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; शिंदे गटानं खातं उघडलं

भाज्यांच्या दरात मोठी वाढ

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाचा परिणाम भाज्यांच्या दरांवर झाला आहे. मुंबईच्या (Mumbai) दादर मार्केटमध्ये भाज्यांचे दर तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत.

कांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर (Price) तेजीत आहेत. घाऊक बाजारांत कवडीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी काही भाज्या फेकून दिल्यात. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे. (Mumbai APMC Market Rates Today)

Vegetables Price In Mumbai
Maharashtra Politics : मुंबई जिंकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा प्लॅन; ठाकरेंना धक्का?

काय आहेत भाजीपाल्याचे नवीन दर?

टोमॅटो - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60ते 70 रुपये प्रति किलो

भेंडी - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60ते 70 रुपये प्रति किलो

कोबी - आधी 20 ते 30 रुपये आणि आता 50 ते 60 रुपये प्रति किलो

मिरच्या - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60 ते 70 रुपये प्रति किलो

घेवडा - आधी 20 ते 30 रुपये आणि आता 40ते 50 रुपये प्रति किलो

फ्लॉवर - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60 ते 70 रुपये प्रति किलो

वांगी - आधी 30 ते 40 रुपये आणि आता 60ते 70 रुपये प्रति किलो

काकडी - आधी 20 ते 30 रुपये आणि आता 40 ते 50 रुपये प्रति किलो

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com