ulhas river
ulhas riversaam tv

धक्कादायक! मित्रांसोबत सहलीला आलेला तरुण उल्हास नदीच्या पाण्यात उतरला अन् होत्याचं नव्हतं झालं

एक तरुण बॅरेज धरणाला लागून असलेल्या उल्हास नदीच्या पाण्यात उतरला, त्यानंतर....

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरलाही (Badlapur) मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपल्याने येथील तलाव,धरण ओसंडून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून धरण परिसरात आणि पाण्यात न जाण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. मात्र, शासनाचे नियम धाब्यावर बसवून पावसाळी सहलीसाठी (Monsoon picnic) चार-पाच तरुण बदलापूरच्या बॅरेज धरणात मागील आले होते. त्यावेळी एक तरुण बॅरेज धरणाला लागून असलेल्या (water drowning) उल्हास नदीच्या (ulhas river) पाण्यात उतरला होता. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. विकी पाईकराव असं मृत तरुणाचं नाव आहे. तरुणाला पोलीसांकडून आणि अग्निशमन दलाकडून शोधण्याचे प्रयत्न सुरू असून तीन दिवसांनंतरही त्याचा मृतदेह सापडला नाहीय.

ulhas river
Health tips : रात्री सतत झोप मोड होतेय ? या पदार्थांचा आहारात समावेश करा

अंबरनाथमध्ये टेम्पो रिव्हर्स घेतल्यानं तरुणाचा मृत्यू

अंबरनाथमध्ये टेम्पो रिव्हर्स घेतल्यानं एका तरुणाचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथच्या कानसई एएमपी गेटसमोरच्या भागात औद्योगिक परिसर असून तिथे फ्रेश फूड नावाची कंपनी आहे. या कंपनीत शनिवारी २३ जुलै रोजी सकाळी ११ च्या सुमारास भरत सकुंडे हा टेम्पोचालक त्याचा टेम्पो घेऊन आला. मात्र, कंपनीत आल्यानंतर हा टेम्पो पुढे घेण्याऐवजी रिव्हर्स घेतल्यानं प्रमोद जाधव या तरुणाचा टेप्मोखाली दबून मृत्यू झाला.

ulhas river
जनतेला जमिनीवरचा नेता हवा; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

याप्रकरणी टेम्पोचालक भरत सकुंडे याच्याविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तरुणाच्या मृत्यूला जबाबदार ठरल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची जामिनावर सुटका केली.दरम्यान,या सगळ्याबाबत कंपनी व्यवस्थापनाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com