पुणे सहकार विभाग महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल !

पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आलीय. मनसे पदाधिकाऱ्याला एका बड्या महीला अधिकाऱ्याने दमदाटी केलीय. सहकार विभागाच्या विभागीय सह निबंधक संगिता डोंगरे यांच्या कार्यालयात हा प्रकार घडलाय.
पुणे सहकार विभाग महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल !
पुणे सहकार विभाग महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल !SaamTvNews

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आलीय. मनसे पदाधिकाऱ्याला एका बड्या महीला अधिकाऱ्याने दमदाटी केलीय. सहकार विभागाच्या विभागीय सह निबंधक संगिता डोंगरे यांच्या कार्यालयात हा प्रकार घडलाय. मनसेचे पदाधिकारी निलेश निकम यांना डोंगरे यांनी अरेरावीची भाषा करत , दमदाटी केली. डोंगरे यांच्या अक्रास्ताळेपणाची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा :

मात्र, डोंगरे यावरती बोलायला तयार नाहीत. मनसे पदाधकारी निलेश निकम एका तक्रार अर्जा संदर्भात माहीती घेण्यासाठी डोंगरे यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. निकम तुम्ही गप्प बसा असे ओरडत, डोंगरे यांनी निकम यांना कार्यालयाबाहेर उचलून फेकण्याची भाषा केली. तुम्हाला बघुन घेईन अशी धमकी ही दिली, असा आरोप निकम यांनी केलाय.

पुणे सहकार विभाग महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल !
धरिला पंढरीचा चोर! कार्तिकी यात्रेत चोरी करणाऱ्या २१ चोरांची टोळी गजाआड

संगिता डोंगरे यांच्या अरेरावी विरोधात सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे निकम यांनी म्हटले आहे. ब्लॅक मेलिंगचा आरोप करुन, डोंगरे यांनी माझी बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे निकम यांनी म्हटले आहे. डोंगरे यांच्याबरोबर बातचीत केली असता डोंगरे यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com