फडणवीसांनी सादर केलेल्या Video अनेक बड्या नेत्यांची नावं, व्हिडिओमध्ये नेमकं काय?

017 मध्ये माझा फोन टॅप झाला आहे. रश्मी शुक्ला यांचा वापर कुणी केला याचे उत्तर सरकारने द्यावे असा प्रश्नही नाना पटोलेंनी (Nana Patole) विचारला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारवरती धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी सरकारमधील कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. फडणवीसांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह अध्यक्षांना दिला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये फडणवीसांनी दिलीप वळसे पाटील, अजित पवार, शरद पवार, छगन भुजबळ यांसारख्या बड्या नेत्यांची नावं घेतली आहेत. या फडणवीसांच्या भाषणाचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कौतुक केले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कायदा सुव्यवस्थेवर भाषण केले मी त्यांचे कौतुक करतो. 2017 मध्ये माझा फोन टॅप झाला आहे. रश्मी शुक्ला यांचा वापर कुणी केला याचे उत्तर सरकारने द्यावे असा प्रश्नही नाना पटोलेंनी (Nana Patole) विचारला आहे. देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे? कोणा-कोणाची नावं त्यामध्ये आहेत ते जाणून घ्या.

Devendra Fadnavis
विधानसभेतील फडणवीसांच्या भाषणाचं नाना पटोलेंकडून कौतुक म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेल्या व्हिडिओचे संभाषण

व्हिडिओ 1

वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे.

ड्रग्जचा व्यवसाय करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण, सट्ट्याच्या पैशातून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. 1 ग्रॅमला लाख रूपये मिळतात, असे सांगायचे.

व्हिडिओ 2

तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे.

शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण? सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

व्हिडिओ 3

राजकारण करायचे असेल तर सीपी, सीआयडी, ईओडब्ल्यू हे सारे तुमचे पाहिजे. मोठ्या साहेबांनी सांगितले. देशमुख 25 लाख रुपये घेऊन आले होते. पण, मी घेतले नाही. नंतर तो पकडला गेला. 25 लाखांत आपली गाडी झाली असती. तो स्वत: देत होता, तरी आपण घेतले नाही. नशिब कसे असते पहा. पण, त्याच दु:ख नाही. आपलीच माणसे आहेत. तो माणूस पाहिजे होता.

व्हिडिओ 4

सातभायेने छगन भुजबळला पैसे घेऊन सोडले. मुंबईला एक पाटणकर नावाची वकील आहे. जज मॅनेज करणे, एवढेच तिचे काम आहे. 1 कोटी ठरले, तर 50 लाख ती ठेवते आणि 50 लाख देते. गिरीश महाजनची फाईल होती, ती पुढे सरकवायला पाहिजे. रावलला आतमध्ये टाकले असते आणि महाजनला उचलले असते. हे दोन उचलले असते, तर हादरून गेले असते.

व्हिडिओ 8

सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला. पवार साहेबांनी डीजींना सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपीला रात्रभर बसविले. पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होते. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर लगेच डीजी चा फोन आला. सीएम, अजितदादा/वळसे पाटील/एसीएस, डीजी होते. रजत नागपूरला निघून गेला. मग सीपीचे फोनवर फोन आले.

सर्व निगेटिव्ह होते. मी कॉपी दिली. शेवटी पवार साहेबांना सांगून अधिकारी बदलंला. अनिल देशमुख असते, तर फायदा झाला असता. प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटीचेंबरला बसवा, असे पवार साहेबांचे ऑर्डर होते. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान हलायचे नाही.

व्हिडिओ 9

अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकार्‍यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.


व्हिडिओ 10

-त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता. एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा. जप्त करायला काय लागते?

- किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले? दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जून खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रिफ, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात. या सर्वांनी पवारांना पत्र दिले.

गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते.

व्हिडिओ 11

साहेबांना फोन करून मिटिंग लावली. मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. 1 दिवसांत एफआयआर ड्राफ्ट करून दिला. स्वत: अभ्यास करून कलमं लावली. अनेक कलमं लावली. पण त्यांनी पॅरेच्या पॅरे गहाळ केली.

व्हिडिओ 18

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण. रेडमध्ये सहभागी होणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे, याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी ब्रीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करून दिले आहे. वेज/नॉन-वेज जेवणापर्यंत सूक्ष्म नियोजन

जेवणाची/राहण्याची आणि रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या, कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत.यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या, असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही त्यांनी सांगितले.

व्हिडिओ 19

विजू पाटीलशी दूरध्वनी संवाद

-गिरीश महाजनचे नाव टाका. मी जबाब तयार करतो. पुढे काय बोलायचे, स्टेटमेंटमध्ये काय टाकायचे, हे सारे निर्देश देतो आहे. भोईटे जाईल, तेव्हा आपला माणूस जाईल आणि तेथे ऐवज ठेऊन देईल. कुणाकडून काय जबाब घ्यायचे, हेही समजावून सांगितले आहे.

व्हिडिओ 24

गिरीश महाजन पुण्यात केव्हा आला, ती माहिती आपण घेतली. मंत्रालयातून काढली. अनिल देशमुख घाबरत नव्हते. त्यांना टार्गेट दिले की ते करायचे. जयंत पाटील/खडसे चांगले संबंध. त्यांनी डायरेक्ट सांगितले होते की, चव्हाण आला की पाहून घ्यायचे. फडणवीस गेला तर एक मतदारसंघ अनिल देशमुखच्या मुलासाठी मोकळा झाला असता. पैसा खूप लागतो एका स्टेजनंतर

व्हिडिओ 25

कोणत्या दिवशी किडनॅप केले ते सांगा, असा प्रश्न विचारला तर सांगायचे पहिल्या आठवड्यात. तारीख कशाला सांगायची? काही भाग गिरीश महाजनला कळला, तर त्याने एफआयआर कॉपी मागवून घेतली. स्टे घेतला. आता प्रयत्न करतात.

मी कधी कुठे दिसतो का? मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशीरा. माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे पवार साहेबांच्या सांगण्यावरून होते आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com