Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

विधान परिषदेसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे.
Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
Nana PatoleSaam Tv

मुंबई: राज्यात विधान परिषद निवडणुकीची (Election) सध्या चर्चा सुरू आहे. २० जून रोजी निवडणूक होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.' भाजप विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकत असल्याचा, गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

विधान परिषद निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून, वेळ आली की ही माहिती समोर आणू, असंही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Nana Patole
मायणी मेडिकल कॉलेज गैरव्यवहार प्रकरण; आप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

केंद्रातील भाजप सरकार सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करत असून, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सत्तेसाठी भाजपने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत, पण बिघाडी आघाडीत नाही तर भाजपमध्ये दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून अडथळे निर्माण केले जात आहेत परंतु आकड्यांचे गणित हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, असंही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

काँग्रेसला (Congress) दुसऱ्या जागेसाठी १२ मतांची आवश्यकता आहे तर भाजपला पाचव्या उमेदवारासाठी २२ मते लागतात. तरीही पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांच्या भरवश्यावर भाजप विजयाचा दावा करत आहे. तो यावेळी चालणार नाही. महाविकास आघाडी भक्कम असून, आवश्यक असलेले संख्याबळ मविआकडे असल्याने मविआचे सहाही उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Nana Patole
Vidhan Parishad Election: चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय हे उभा महाराष्ट्र बघेल: अजित पवार

अग्निपथ योजना मागे घेण्यास भाग पाडू

राजनंदिनी दळवी अकॅडमीच्या प्रशिक्षक व युवकांनी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अग्निपथ योजना रद्द करावी या मागणीचे निवेदन दिले. यावेळी नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजनेला देशभरातून तरुण तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरले आहेत. अशा प्रकारच्या सैन्य भरतीमुळे तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होणार आहे.

तरुणांचा या भरतीप्रक्रियेला विरोध असून देशभर तरुणांचे आंदोलन पेटले आहे परंतु हिंसक मार्गाचा अवलंब तरुणांनी करु नये. काँग्रेस पक्ष तरुणवर्गावर अन्याय होऊ देणार नाही, आम्ही तरुणवर्गांसोबत आहेत. केंद्र सरकारने लादलेली अग्निपथ योजना मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com