राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर विद्या चव्हाणांची वर्णी लागण्याची शक्यता

Vidya Chavan Latest News: रुपाली चाकणकर यांची २० ऑक्टोबरला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर विद्या चव्हाणांची वर्णी लागण्याची शक्यता
Vidya Chavan is likely to be the next woman state president of NCPSaam Tv

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये मोठा बदल होणार आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष (Women State President) पदावर राष्ट्रवादीच्या माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान (Fauzia Khan) यांच्या उपस्थित पत्रकार परिषदेत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पद रिक्त होते. आता या जागेवर विद्या चव्हाण यांची वर्णी लागणार आहे. (Vidya Chavan is likely to be the next woman state president of NCP)

हे देखील पाहा -

राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्या नंतर रिक्त जागेवर विद्या चव्हाण यांची वर्णी लागणार आहे. रुपाली चाकणकर यांची २० ऑक्टोबरला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या पदाच्या चर्चेत सुरुवातील विद्या चव्हाण यांचंही नाव आघाडीवर होतं. मात्र तेव्हा रुपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनतंर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर विद्या चव्हाणांची निवड होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.