Eknath Shinde : पुण्यात अवतरले चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डुप्लिकेट

या डुप्लिकेट शिंदेंना बघून पुणेकरांना जणू एकनाथ शिंदेच आलेत का? असा भास झाला.
Pune Eknath Shinde Duplicate
Pune Eknath Shinde DuplicateSaam TV

सचिन जाधव, साम टिव्ही

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच पुणे (Pune) दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते फुटबॉल मैदानाचे उद्‌घाटन करणार आहेत. तसेच, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरतीही करणार आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या पुणे दौऱ्याआधीच पुण्यात त्यांचे डुप्लिकेट अवतरले आहेत. या डुप्लिकेट शिंदेंना बघून पुणेकरांना जणू एकनाथ शिंदेच आलेत का? असा भास पुणेकरांना झाला. (Pune Eknath Shinde Duplicate Vijay Raje Mane)

Pune Eknath Shinde Duplicate
Sanjay Raut : ईडीच्या ताब्यात असणाऱ्या संजय राऊतांकडे संपत्ती किती? जाणून घ्या...

पुण्यात एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसणारे एक व्यक्ती आहेत. विजयराजे माने असे त्यांचे नाव. विजयराजे माने हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात. माने यांनी चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा, आणि ते परिधान करत असलेले वाईट शर्ट आणि वाईट पॅन्ट, आणि ते वापरत असलेला एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांचे डुप्लिकेट दिसतात.

एवढेच नाही तर अनेक सामान्य पुणेकर हे माने यांना भेटत आपल्या मागण्यांचा अर्ज देखील देतात, माने सांगतात की मी जिथे जातो तिथे लोक माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह करतात, एवढेच नाही तर २१ जून रोजी ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी त्यांच्या घराबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. (Eknath Shinde News)

Pune Eknath Shinde Duplicate
मोठी बातमी! राऊतांना घेऊन ईडीचं पथक जे.जे रुग्णालयाकडे रवाना; वैद्यकीय तपासणी होणार

आजही माने ज्यावेळी रस्त्यावरून जातात त्यावेळेस लोक त्यांना थांबवत सेल्फी घेण्याचा आग्रह करतात. माने हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. दुसरीकडे, शिवसेनेतील आऊटगोईंग रोखण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आता मैदानात उतरले आहेत.

आदित्य यांच्या सभांना चांगली गर्दीही होत आहे. ते आपल्या सभांमधून बंडखोरांवर सडतोड शब्दांत टीकास्त्र सोडत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनीही राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्याचा एक भाग म्हणून एकनाथ शिंदे हे उद्या म्हणजेच मंगळवारी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com