बदलापूरच्या चंदेरी गडावरुन तरुण खाली कोसळला; रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली

बदलापूरच्या चंदेरी गडावरुन तरुण खाली कोसळला; रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली
Chanderi fort badlapursaam tv

बदलापूर : बदलापूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडलीय. बदलापूरच्या चंदेरी गडावरून (chanderi Fort) एक बावीस वर्षीय तरुण खाली पडल्याने खळबळ उडाली आहे. विराज म्हस्के (२२) (Viraj Mhaske) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. विराज हा मुलुंड येथील रहिवासी असून ट्रेकिंगसाठी तो चंदेरी गडावर गेला होता. विराजसह इतर सात तरुणही आज मंगळवारी सकाळी ट्रेकिंगला (Trekking) गेले होते. या गंभीर घटनेची माहिती मिळताच नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीम (Rescue Team) गडावर पोहचली आहे. दरम्यान, बदलापूर ग्रामीण आणि पनवेल पोलीस संपर्कात एकमेकांच्या संपर्कात असून पुढील तपास सुरु आहे. विराजला पनवेल किंवा चिंचवली गावात आणण्याचा प्रयत्न केला जात असून चिंचवलीत रुग्णवाहीकाही दाखल झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.