अखेर विराज सापडला; 'असा' होता बदलापूरच्या चंदेरी गडावरचा २२ तासांचा थरार

बदलापूरमध्ये काल बुधवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती.
Chanderi fort badlapur
Chanderi fort badlapursaam tv

बदलापूर : बदलापूरमध्ये काल बुधवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती.बदलापूरच्या चंदेरी गडावरून (chanderi Fort)बावीस वर्षीय तरुण विराज म्हस्के (viraj mhaske) खाली पडल्याने खळबळ माजली होती.या गंभीर घटनेची माहिती मिळताच नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीम दुपारी चार वाजताच्या सुमारास (Rescue Team) गडावर पोहचली होती. त्यानंतर नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीमच्या तब्बल २२ तासांच्या अथक प्रयत्नांमुळ गंभीर दुखापत झालेला विराज सापडला आहे. त्यानंतर विराजला रेस्क्यू टीमनं चिंचवली गावात आणलं. सेवेसाठी आधीच तत्पर असलेल्या रुग्णवाहीकेतून विराजला उल्हासनगरच्या (ulhasnagar) मध्यवर्ती रुग्णलयात (hospital) दाखल केले.त्यानंतर विराजला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केली असल्यांची माहिती डॉ. क्षितीजा खरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Chanderi fort badlapur
युक्रेनकडून T-90 रणगाडा उद्धवस्त; रशियाचा दावा, देशाची चिंता वाढली!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विराज हा मुलुंड येथील रहिवासी असून ट्रेकिंगसाठी तो चंदेरी गडावर गेला होता.विराजसह इतर सात तरुणही आज मंगळवारी सकाळी ट्रेकिंगला (Trekking) गेले होते. दरम्यान, बदलापूर ग्रामीण आणि पनवेल पोलीस एकमेकांच्या संपर्कात होते. बुधवारी दुपारी अकरा वाजता बदलापूर जवळील चंदेरी गडावरून एक बावीस वर्षीय तरुण खाली दरीत पडला होता. विराज म्हस्के असं या तरुणाचं नाव आहे. त्याला वाचविण्यासाठी बदलापूरमधील नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीम दुपारी चार वाजेपर्यंत गडावर पोहचली होती.दुपारी एक वाजता 108 रुग्णवाहिका चिंचवली गावात सेवेसाठी तत्पर होती. मात्र विराज जंगलात पडल्याने रेस्क्यू टीमने दिवस रात्र करून 22 तासात त्याचा शोध घेतला. डॉक्टर क्षितिजा खरे आणि श्रद्धा खरे या चिंचवली गावात मुक्कामाला होत्या.

विराज सापडल्यानंतर तातडीनं डॉक्टर क्षितिजा आणि श्रद्धा यांनी उपचार सुरू केले. त्यानंतर विराजला उल्हासनगर च्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.रेस्क्यू टीममध्ये चिंचवली गावातील गावकरी,पोलीस पाटील यांनी सहकार्य करून अखेर विराज म्हस्के याला सुखरूप चंदेरी गडावरून खाली आणले.तो गंभीर जखमी असून त्याला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती डॉ.क्षितिजा खरे यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com