Viral Video : पावसात मंत्र्यांच्या PAसाठी खास छत्री? पण माजी मंत्री महादेव जानकर पळतच सुटले
Mahadev Jankar News : माजी मंत्री महादेव जानकर यांचा पावसात पळतानाचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये हिरव्या शर्टमध्ये धावून जाताना महादेव जानकर दिसतात. तर याच व्हिडिओतील फ्रेममध्ये तिघेजण छत्री घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. जानकरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महादेव जानकर यांच्या व्हिडिओवरून (Viral Video) उलटसुलट राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओत एक जण पोलीस शिपाई आहे.. दुसरा एका मंत्र्याचा पीए आहे, अशी शक्यता वर्तविण्यात जात आहे. तिसऱ्या व्यक्तीबाबत माहिती समोर आलेली आहे .
पाऊस सुरु झाल्यामुळे पोलीस शिपायाने सध्याच्या मंत्र्यांच्या पीएसाठी छत्र धरली, असा टोला सोशल मीडियातून लगावला जातोय. शिवाय समय बलवान है.. असं म्हणत याच व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.. अर्थात पाऊस व्हिडिओतही पडलाय.. त्यानंतर घडलेला या किश्श्यावर प्रतिक्रियांचा महापूर आला नाही तरच नवल...
आज अचानक सकाळी पावसाने हजेरी लावली.. गेले काही दिवस अवकाळी पाऊस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात बरसतोय.. आज तोच पाऊस दक्षिण मुंबईतही बरसला.. त्याचवेळी उडालेली महादेव जानकरांची तारांबळ या व्हिडिओतून पाहायला मिळाली...
भर पावसात पळत जाऊन त्यांनी आडोशाला जाण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं... पावसामुळे फक्त शेतकऱ्यांची पळापळ होते, अशातला भाग नाही, हे या व्हिडीओतून अधोरेखित झालंय...
जाणून घ्या महादेव जानकरांची राजकीय पार्श्वभूमी...
महादेव जानकर (Mahadev Jankar) हे राषय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी मंत्रिपद देखील भूषवलं आहे. जानकर यांच्या पक्षाची मराठवाड्यात मोठी ताकद आहे. जानकर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळसवडे गावातील आहेत. पळसवडे गावात त्यांचे दोन भाऊ राहतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.