Video : चेन खेचल्याने नदीच्या पुलावर थांबली ट्रेन; सहाय्यक लोको पायलटनं दाखवलं धाडस

Godan Express Chain Pulling : टिटवाळा आणि खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर रेल्वेची चेन खेचल्याने ११०५९ ट्रेन (गोदान एक्सप्रेस) थांबली.
Video : चेन खेचल्याने नदीच्या पुलावर थांबली ट्रेन; सहाय्यक लोको पायलटनं दाखवलं धाडस
Viral Video Of Godan Express Chain Pulling Reset By Assistant Loco Pilot Satish KumarTwitter/@ShivajiIRTS

मुंबई: रेल्वे प्रवास करत असताना काही आपातकालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात चेन असते, जे खेचल्यावर प्रवाशाही हवं तेव्हा ट्रेन थांबवू शकतात. मात्र, अनेकदा प्रवाशांकडून विनाकारण अथवा छोट्याश्या कारणासाठीही ही चेन खेचतात त्यामुळे रेल्वे (Indian Railway) थांबते. मात्र याचा फटका संपुर्ण यंत्रणेला बसतो. अशीच एक घटना गुरुवारी घडली. ऐन नदीच्या मधोमध पुलावरुन रेल्वे जात होती. मात्र एका अज्ञात प्रवाशानं रेल्वेची चेन खेचली (chain pulling in train) ज्यामुळे नदीच्या मधोमध असलेल्या रेल्वे पुलावर गोदान एक्सप्रेस थांबली. अशात या एक्सप्रेसच्या लोको पायलटने (Assistant Loco Pilot) आपला जीव धोक्यात घालत ट्रेनखाली जाऊन अलार्म चेन रीसेट केली आणि रेल्वे सुरु केली.

हे देखील पाहा -

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Chief Public Relations Officer, Central Railway, Mumbai) यांनी याबाबतचा थरारक व्हिडिओ (Video) शेयर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईनजीक असलेल्या टिटवाळा आणि खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर रेल्वेची चेन खेचल्याने ११०५९ ट्रेन (गोदान एक्सप्रेस) थांबली. अशात रेल्वे लवकारात लवकर सरु करण्यासाठी सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार (Satish Kumar, Assistant Loco Pilot) हे स्वतःचा जीव धोक्यात घालत ट्रेनच्या खाली शिरले.

Viral Video Of Godan Express Chain Pulling Reset By Assistant Loco Pilot Satish Kumar
कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणी ठार; जुना पुणे नाका येथील घटना

खाली नदी आणि वर ट्रेन अशा धोकादायक परिस्थितीत त्यांनी टिटवाळा आणि खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर थांबलेल्या ट्रेन 11059 गोदान एक्स्प्रेसची (Godan Express 11059) अलार्म चेन रीसेट केली. त्यानंतर ट्रेन आपल्या पुढील प्रवासाला निघाली. मात्र या गोंधळात काही मिनिटं वाया तर गेलीच शिवाय ट्रेनच्या लोको सहाय्यक लोको पायलटला आपला जीव धोक्यात टाकून रेल्वे सुरु करावी लागली. त्यामुळे अलार्म चेन अनावश्यकपणे ओढू नका, ही सुविधा फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे असं आवाहन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी प्रवाशांना केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.