Crime : विरारमध्ये बांधकाम व्यवसायिकाची निर्घृण हत्या; आरोपी फरार
Crime : विरारमध्ये बांधकाम व्यवसायिकाची निर्घृण हत्या; आरोपी फरारचेतन इंगळे

Crime : विरारमध्ये बांधकाम व्यवसायिकाची निर्घृण हत्या; आरोपी फरार

बांधकाम व्यावसायिक निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

विरार : बांधकाम व्यावसायिक निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धारधार शस्त्राने निशांत यांच्यावर सपासप वार करण्यात आले आहेत. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी कदम यांना रस्त्यात रोखून हत्या केल्याचे समोर आले आहे आणि आरोपी फरार झाले आहेत.

हे देखील पहा-

विरार पूर्व फुलपाडा परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यवसायिक निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी धारधार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास कदम आपल्या राहत्या घरातून कार्यालयात जात होते. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर अंधार असलेल्या ठिकाणी आरोपींनी त्यांची अडवणूक केली.

Crime : विरारमध्ये बांधकाम व्यवसायिकाची निर्घृण हत्या; आरोपी फरार
Crime: एकुलत्या एक मुलाकडून संपूर्ण कुटुंबाची हत्या!

यानंतर कदम यांच्यावर धारधार शस्त्राने डोक्यात आणि अंगावर वार केले आहेत. आरोपींनी केलेल्या गंभीर हल्ल्यात कदम यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे. निशांत कदम यांना काही दिवसांपासून फोनवरून धमक्याचे फोन येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. आर्थिक वादातून आरोपींनी हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com