Girl Dies Of Snake Bite: दुर्दैवी! गाढ झोपेत असताना साप चावला; काही तासांतच १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; परिसरात हळहळ

Girl Dies Of Snake Bite: अर्नाळ्यात विषारी साप चावल्याने एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Girl Dies Of Snake Bite
Girl Dies Of Snake BiteSaam tv

Virar Arnala news In Marathi:

विरारच्या अर्नाळ्यातून धक्कादायक बातमी हाती आली आहे. अर्नाळ्यात विषारी साप चावल्याने एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या १७ वर्षीय मुलीच्या मृत्यूने अर्नाळ्यातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

विरारच्या अर्नाळ्यात साप चावल्याने १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. संजना अशोक चव्हाण असं मृत मुलीचं नाव आहे. १७ वर्षीय संजना घरात झोपली असताना तिच्या दोन्ही हाताला सापाने दंश केला.

सापाने दंश केल्याने संजनाला तातडीने बोलींज येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार न मिळाल्याने त्यानंतर विरार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संजनाला विरार येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करत रात्री बाराच्या सुमारास मृत घोषित केले.

Girl Dies Of Snake Bite
Wardha Crime News : आश्रम शाळेतील विद्यार्थांच्या मृत्यूचे गूढ उलगडले; शाळेतीलच अल्पवयीन मुलाने केली हत्या

डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर सोमवारी १० वाजता शवविच्छेदन होईल असल्याचे सांगितले. मात्र, शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर सोमवारी रुग्णालयात फिरकले देखील नाही. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात पोहोचून डॉक्टरांकडून मृतदेहाचा शवविच्छेदन करून घेतला.

रुग्णालयाकडून तब्बल १३ तासांनी मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयाच्या ताब्यात देण्यात आला. मुलीला वेळीच उपचार झाले नाही. तसेच मृतदेह देण्यासही विलंब झाल्याने मुलीच्या कुटुंबीयाना नाहक त्रास झाल्याचे समोर आले आहे.

मुलीच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंब राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Girl Dies Of Snake Bite
Mumbai Crime News: करिअरसाठी पार आंधळी झाली! बाळ रस्त्यावर टाकून आई नोकरीला पळाली; मुंबईमधील हृदय हेलावणारी घटना

परभणीत २० वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

परभणीच्या पूर्णा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्णा तालुक्यातील माखणी येथील २० वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्ञानेश्वर राजेश आवरगंड असे या तरुणाचे नाव आहे.

२० वर्षीय ज्ञानेश्वरने जीवन का संपवले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com