विधानपरिषदेची निवडणूक होणारच; शेवटच्या क्षणी भाजपकडून 'ही' खेळी

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे.
विधानपरिषदेची निवडणूक होणारच; शेवटच्या क्षणी भाजपकडून 'ही' खेळी
MLC Election 2022Saam Tv

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीबरोबर विधानपरिषदेची निवडणूकही (MLC Election) चुरशीची होणार आहे. राज्यसभेत 6 व्या जागेसाठी भाजप विरोधात शिवसेना अशी रंगत पाहायला मिळाली.मात्र आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप (BJP) विरोधात काँग्रेस (Congress) अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे २० जून रोजी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे. (MLC Election 2022 Latest News In Marathi)

MLC Election 2022
मोठी बातमी! सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत . तर भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे उमेदवार रिंगणात असणार आहेत. या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर उभे असेलेले सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेसाठीचा अर्ज मागे घेतला आहे. तर कांग्रेसकडून उमेदवार म्हणून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमश्या पाडवी आणि सचिन अहिर यांना संधी दिली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एमआयएमचे २ आमदार मतदान कोणाला करणार याकडे साऱ्यांकेड लक्ष असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करत भाजपने सहावी जागा जिंकली. त्यानंतर विधानपरिषदेत १० व्या जागेसाठी भाजप किती मतं फोडाफोड करणार हे पाहवे लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांचा कोटा आहे.तसेच विधानपरिषदेचे मतदान हे गुप्त मतदान असणार आहे.

MLC Election 2022
विधान परिषद निवडणूकीत मतदानाची संधी मिळावी; अनिल देशमुखांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

सत्ताधारी महाविकास आघाडी संख्याबळ

शिवसेना - ५५

राष्ट्रवादी - ५३

काँग्रेस - ४४

बहुजन विकास आघाडी - ३

समाजवादी पार्टी - २

प्रहार जनशक्ती पार्टी - २

माकप - १

शेकाप - १

स्वाभिमानी पक्ष - १

क्रांतिकारी शेतकरी पार्टी - १

अपक्ष - ८

सत्ताधारीकडे एकूण संख्याबळ- १७१

......................

विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ

भाजप - १०६

जनसुराज्य शक्ती - १

राष्ट्रीय समाज पक्ष - १

मनसे १

अपक्ष - ५

विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ - ११४

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com