अट्टल सोनसाखळी चोरट्याला सीसीटीव्हीच्या मदतीने विष्णूनगर पोलिसांनी केली अटक

नवापाडा येथील 55 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या सोनसाखळी चोरास विष्णुनगर पोलिसांनी नवी मुंबई गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले आहे. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 16.5 ग्रॅम वजनाचे 2 मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.
अट्टल सोनसाखळी चोरट्याला सीसीटीव्हीच्या मदतीने विष्णूनगर पोलिसांनी केली अटक
अट्टल सोनसाखळी चोरट्याला सीसीटीव्हीच्या मदतीने विष्णूनगर पोलिसांनी केली अटकप्रदीप भणगे

डोंबिवली - नवापाडा dombivali navpada येथील 55 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या सोनसाखळी चोरासchain snatcher विष्णुनगर पोलिसांनी vishnu nagar police नवी मुंबई new bombay crime bureau गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले आहे. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 16.5 ग्रॅम वजनाचे 2 मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. फजल कुरेशी (वय 25) असे आरोपीचे नाव असून सूचक नाका, टाटा पावर, कल्याण पूर्व येथे राहणारा आहे.यापूर्वी त्याच्यावर 11 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. Vishnunagar police arrested the thief with the help of CCTV

हे देखील पहा -

डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरात राहणाऱ्या अनिता राऊळ (वय 55) या 16 मे रोजी भागशाळा मैदान bhagshala ground येथे पतीसोबत वॉकिंगसाठी गेल्या होत्या. सकाळी 5.30 च्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डोंबिवली एसीपी जय मोरे आणि वपोनी संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या cctv आधारे आरोपीचा शोध लावला आणि नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांकडून त्याचा ताबा मिळवीत तपास केला असता त्याने गुन्हा मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com