'मदत नको तर समाजाकडून सहकार्य हवे' हा दिव्यांगांचा विचार सकारात्मक : राज्यपाल कोश्यारी

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या नेत्रहीन महिलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली.
Bhagat singh koshyari
Bhagat singh koshyari saam tv

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी रक्षाबंधननिमित्त दिव्यांग महिलांकडून राखी बांधली. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या नेत्रहीन महिलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली. राज्यपालांनी सर्व दिव्यांग महिलांना शुभेच्छा देताना स्वतःच्या वतीने ओवाळणी भेट दिली. (Bhagat Singh Koshyari News)

Bhagat singh koshyari
Gram Panchayat Election 2022: शिंदे गटातील आमदारांचे मताधिक्य टिकवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; मोर्चेबांधणी सुरू

रक्षाबंधनानिमित्त राखी बांधल्यानंतर राज्यपाल कोश्यारी म्हणाले, 'नेत्रहीन व्यक्तींना दृष्टी नसते. परंतु ईश्वर त्यांना त्या ऐवजी काहीतरी विशेष गुण देतो असे सांगून आज नेत्रहीन व्यक्ती यशस्वी उद्योजक, क्रीडापटू तसेच इतरही क्षेत्रात अग्रणी राहून आत्मनिर्भर झाल्याचे पाहायला मिळते. सहानुभूती किंवा मदत नको तर समाजाकडून सहकार्य हवे आहे हा दिव्यांग लोकांचा विचार अतिशय सकारात्मक आहे'.

Bhagat singh koshyari
Sanjay Raut |रडायचं नाही लढायचं; संजय राऊत यांनी ईडी कोठडीतून लिहिले विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र

दरम्यान, या संस्थेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी नॅबच्या कार्याची माहिती दिली. अंध महिलांनी या वर्षी पंजाब मधील वाघा आणि अटारी सीमेवर जाऊन आपल्या जवानांना राखी बांधल्याचे मानद सचिव पूजा ओबेरॉय यांनी सांगितले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था नेत्रहीन व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी कार्य करते. संस्थेच्या महिला सक्षमीकरण विभागातर्फे महिलांना राखी व तोरण तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com