भाजपाचे माजी नगरसेवक विवेक यादवला अटक

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भाजपाचे माजी नगरसेवक विवेक यादवला अटक
भाजपाचे माजी नगरसेवक विवेक यादवला अटकसागर आव्हाड

पुणे - कुख्यात गुन्हेगाराच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणात फरार असलेले भाजपाचे माजी नगरसेवक विवेक यादवला Vivek Yadav पोलिसांनी Police पकडले आहे. त्यांना गुजरात बॉर्डरवरून Gujrat Border रात्री पकडण्यात आले आहे. यापूर्वी खुनाची सुपारी घेणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कोंढवा Kondhwa पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या खुनाचा कट उधळत किलर राजन जॉन राजमनी व इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख यांना अटक केली आहे.

हे देखील पहा -

विवेक यादव भाजपचे लष्कर कॅन्टोमेंटचे माजी नगरसेवक आहेत. दरम्यान २०१६ मध्ये विवेक यादव यांच्यावर गणेशोत्सव काळात रात्री गोळीबार करण्यात आली होता. सराईत गुन्हेगार बबलू गवळी याने गोळीबार केला होता. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य असल्याची माहिती आहे. त्यातून हा गोळीबार झाला असे सांगण्यात आले. या गोळीबाराचा राग काढण्यासाठी विवेक यादव यांनी या दोघांना बबलू गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती. बबलू गवळीला कुठे आणि कशा पद्धतीने ठार मारायचे हे देखील ठरले होते. कॉल आणि चॅटिंगद्वारे त्याबाबत या दोघांचे बोलणे झाले होते.

भाजपाचे माजी नगरसेवक विवेक यादवला अटक
देवा सारखं धावून आलात भाऊ! पूरातून 17 जणांचा वाचला जीव

दरम्यान, बबलू गवळी कोरोनामुळे जामिनावर कारागृहातुन बाहेर आहे. त्याला या काळात ठार मारायचे होते. पण, ही माहिती पोलिसांना मिळाली खुनापूर्वीच हा कट उधळला गेला. आरोपींकडून ३ पिस्तुल व ७ काडतुसे असा साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप देखील विवेक यादव याचा साथीदार आणि पिस्तुल पुरवणारा सापडलेला नसून त्यांचा शोध सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com