वाबळेवाडीच्या वारे गुरुजींचं बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं निलंबन...(पहा व्हिडिओ)

शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलचे माजी प्रभारी मुख्याध्यापक आणि विद्यमान सहशिक्षक दत्तात्रय वारे यांना त्यांच्यावरील आरोपाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करा
वाबळेवाडीच्या वारे गुरुजींचं बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं निलंबन...(पहा व्हिडिओ)
वाबळेवाडीच्या वारे गुरुजींचं बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं निलंबन...(पहा व्हिडिओ)Saam Tv

पुणे : शिरूर Shirur तालुक्यातील वाबळेवाडी Wablewadi येथील अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलचे Atal Bihari Vajpayee International School माजी प्रभारी मुख्याध्यापक आणि विद्यमान सहशिक्षक दत्तात्रय वारे यांना त्यांच्यावरील आरोपाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करा, असा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी तेजस प्रकल्पांतर्गत या शाळेची निवड केली होती. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांकडून देणगी घेण्यासाठी खास बाब म्हणून या शाळेला परवानगी देण्यात आली होती.

पहा व्हिडिओ-

यानंतर याच शाळेच्या धर्तीवर राज्यातील १०० शाळांची ओजस प्रकल्पांतर्गत निवड करून, त्या शाळांमधील गुणवत्ता वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने State Government घेतला होता. हा निर्णय घेतल्यानंतर वाबळेवाडी शाळेला इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा देण्यात आला होता. आता राज्य सरकारनेही हा दर्जा काढून घेतला आहे. दत्तात्रय वारे हे या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार नियमानुसारच शाळेला देणगी घेतली होती, असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

वाबळेवाडीच्या वारे गुरुजींचं बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं निलंबन...(पहा व्हिडिओ)
NCBच्या अधिकाऱ्यांची मुंबई पोलीस चौकशी करणार- दिलीप वळसे पाटील

परंतु, त्यांनी या स्वतःच्या नावावर सुमारे साडेआठ कोटी रुपये किमतीची जमीन खरेदी केल्याची तक्रार झाली आहे. त्यानंतर स्थानिक विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश मिळत नसल्याची तक्रार एका पालकाने जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीनंतर त्यांची चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरु होताच, त्यांना प्रभारी मुख्याध्यापक पदावरून दूर केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सभागृहाला माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com