Pune: अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; 7 नराधमांना अटक
Pune: अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; 7 नराधमांना अटकसागर आव्हाड

Pune: अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; 7 नराधमांना अटक

पुण्यातील वानवडी परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सागर आव्हाड

पुणे : पुण्यातील वानवडी Wanvadi परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे Pune शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

आरोपींनी मुलीचे रिक्षातून अपहरण करून मुलीला वानवडी परिसरात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

ही घटना रविवारी वानवडी परिसरात घडली असून ही घटना आज उघडकीस आहे. मुलीला रिक्षात बसवून एका ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Pune: अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; 7 नराधमांना अटक
Parbhani: दुधना प्रकल्पाचा नदीपात्रात विसर्ग; शेतीचे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, एका ठिकाणी 14 वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी थांबली होती. त्यावेळी ते आरोपी रिक्षातून आले आणि त्यांनी मुलीला रिक्षात बसवले आणि एका ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार Rape केला. या घटनेतील पीडित मुलीची प्रकृती गंभीर आहे. तर तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना समजताच वानवडी पोलिसांनी 7 नराधमांना बेड्या ठोकल्या Arrest आहेत. तसेच या आरोपींसोबत त्यांचे इतर साथीदार देखील असल्याचे समोर आले आहे. त्या आरोपींना न्यायालयात नेण्यात आले आहे. पोलीस Pune Police त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. तर ही घटना अत्यंत संवेदनशील आहे त्यामुळे याबाबत संपूर्ण कारवाई पूर्ण केल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com