
- सचिन जाधव
Pune News : राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने हाेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पुणेकरांना जून महिन्यात पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी महापालिकेने शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद (pune water cut) ठेवण्याचा निणर्य घेतला आहे. त्याबाबतचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. (Maharashtra News)
पुणे महापालिकेने शहरात 'रोटेशन' पद्धतीने शहरातील विविध भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. येत्या गुरुवारपासून (ता. 25) त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वेळापत्रकानूसार या दिवशी भागातील पाणीपूरवठा राहणार बंद
सोमवार - संपूर्ण वडगाव बुद्रुक परिसर (तुकाईनगर, जाधवनगर, चव्हाणबाग, आनंद मंगल कार्यालय परिसर, धायरी परिसर, दांगटनगर, माणिकबाग परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर), आंबेगाव बुद्रुक परिसर, विकासनगर, घुलेनगर, धबाडी, विष्णूपुरम.
मंगळवार - आगम मंदिर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, वंडरसिटी परिसर, साईनगर, आचलफार्म.
बुधवार - संपूर्ण बालाजीनगर, स.नं. १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी व भारती विद्यापीठामागील परिसर.
गुरुवार - सहकारनगर भाग १, धनकवडी व स.नं.७,८,२,३ बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलत नगर, कलानगर, गुलाब नगर, चैतन्यनगर, सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर.
शुक्रवार - गुजरवाडी, निंबाळकरवस्ती, वरखेडेनगर,उत्कर्ष सोसायटी,शेलारमळा, सुंदरबन सोसायटी,महादेवनगर, माउलीनगर, शिवशंभोनगर,आनंदनगर,विद्यानगर, महावीरनगर,राजस सोसायटी, सुखसाखरनगर भाग १,निलया सोसायटी, हिरामण बनकर शाळेजवळील परिसर, स्वामी समर्थनगर.
शनिवार - साईनगर, गजानन नगर, राजीव गांधीनगर, काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क, सुखसागर नगर 2, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा गावठाण, हगवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथ नगर, अजमेरा पार्क, अंबिकानगर, सरगम चाळ, शिवरायनगर, शांतीनगर, महानंदा.
रविवार - टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, कोलतेपाटील सोसायटी, बधेनगर, खडीमशीन चौक, पिसोळी रोड, इस्कॉन मंदिर परिसर, उन्नती सोसायटी, तालाब कंपनीसमोरील परिसर, वाघवस्ती, श्रद्धानगर, विष्णू ठोसरनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, संपूर्ण येवलेवाडी, राजमाता कॉलनी परिसर.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.