
भुषण शिंदे
मुंबई: आम्ही हिंदुत्वाने चार्ज असून आम्हाला चार्जिंगची गरज नाही असा सणासणीत टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विरोधकांना लगावला आहे. आज (सोमवारी) मुंबईतील हाजीअलीमध्ये चार्जिंग पॉईंटच्या उदघाटन सोहळ्याच्या ठिकाणी ते बोलत होते. हिंदुत्वाच्या (Hindutva Politics) मुद्द्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, "जे हिंदुत्वाने आधीच चार्ज आहेत त्यांना चार्जिंग पॉईंटची गरज नाही. आम्ही आधीच हिंदुत्वाने चार्ज आहोत. ज्यांना हिंदुत्वाच्या चार्जिंगची गरज आहे त्यांच्यासाठी चार्जिंग पॉईंट दिले आहेत" असा सणसणीत टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच इतर मुद्यांवर स्वतः मुख्यमंत्री येत्या १४ मे वा बोलतील याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे. (We are charged with Hindutva, we don't need charging: Aditya Thackeray lashes out at opponents)
हे देखील पाहा -
राज्यात हिंदुत्वाचं राजकारण तापलं
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज्यातलं राजकारण तापलं आहे. खरे हिंदुत्ववादी आम्हीच आहोत हे दाखव्यासाठी भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यात स्पर्धा लागली आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील जोरदार प्रयत्न करत आहेत. नुकताच त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा समोर आणला. तसेच महाआरती, हनुमान चालीसा पठण यांचंही आयोजन मनसेकडून करण्यात आलंय. याशिवाय राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील येत्या १० जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
असा असेल आदित्य ठाकरेंचा दौरा
१० जूनला रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या अयोध्या दौऱ्यात अनेक कार्यक्रम असणार आहेत.
१) प्रभू श्री राम जन्मभूमीचे दर्शन
२) हनुमान गढी दर्शन
३) लक्ष्मण किल्ला दर्शन
४) पत्रकार परीषद
५) शरयू नदी महाआरती
अशा प्रकारे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वरुप असणार आहे. दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेचा अयोध्या दौरा विरुद्धा शिवसेनेचा अयोध्या दौरा असं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय. यात आता कुणाचा अयोध्या दौरा सर्वात पावरफुल असेल हे येत्या काळात कळेल.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.