वुई आर द मास्टर ब्लास्टर; शिवसेनेच्या सभेबाबत संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Sanjay Raut About Shivsena Public Meeting: सुर्यावर थुंकलं किंवा हिमालयाच्या दिशेने तोंड वेंगाडूव दाखवलं म्हणून हिमालयाचं आणि सुर्याचं महत्वं कमी होत नाही. हे नशेबाज लोक असतात. - राऊत
वुई आर द मास्टर ब्लास्टर; शिवसेनेच्या सभेबाबत संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
Sanjay Raut About Shivsena Public MeetingSaam Tv

मुंबई: बीकेसीच्या मैदानात आज (१४ मे) ला शिवसेनेची भव्य सभा (Public Meeting) होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज सभेल संबोधित करणार आहे. याबाबत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) सूचक वक्तव्य केलं आहे. आजच्या सभेतील उद्धव ठाकरेंच्या भाषणातून विरोधकांच्या पोटातली जळजळ बरी होईल आणि सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं राऊत म्हणाले आहेत. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आजच्या सभेच्या तयारीबाबतही माहिती दिली आहे. (We Are The Master Blaster; Sanjay Raut's suggestive statement regarding todays ShivSena public meeting)

हे देखील पाहा -

संजय राऊत म्हणाले की, सभेसाठी बांधण्यात आलेलं मुंबईतील हे आतापर्यंतचं सर्वात मोठं व्यासपीठ असेल. शिवसेनेचा कारभार भव्यच असतो. आज मैदनात उतरण्याच्या निश्चयानं, जिद्दीनं या सभेचं आयोजन केलं आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाची वाट पाहत होते. गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन सभा घेतली आता त्यानंतर प्रत्यक्षात एवढी मोठी सभा होत आहे.

महाराष्ट्रातलं, देशाचं वातावरण आणि राजकारणाला आलेला गडूळपणा हा आजच्या सभने खासकरून उद्धव ठाकरेंच्या भाषणाने पुर्णपणे दूर होईल. महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल आणि आकाशात केवळ शिवसेनेचाच भगवा धनुष्यबाण दिसेल असं राऊत म्हणाले.

भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. ही पोटदुखी आणि जळजळ आहे त्यावर आजच्या सभेत उपचार केले जातील. आम्हाला कोणाचा बुस्टर डोस आम्हाला माहित नाही, आमची फटकेबाजी असते. वुई आर द मास्टर ब्लास्टर असं म्हणत राऊतांनी विरोधकांना टोलवा लगावला आहे.

पुढे राऊत म्हणाले की, शिवसेना आणि गर्दी याचं एक नातं आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे लोकं आपोआप जमतात. उद्धव ठाकरेंच्या सभेला आणि भाषणाची उत्सुकता ही महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आहे. या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी ही सभा आहे. ही ऐतिहासिक आणि क्रांतीकारक सभा असेल असं राऊत म्हणाले आहेत.

अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत राऊतांनी नाव न घेता समाचार घेतला आहे. राऊत म्हणाले की, काही लोक हिमालयाच्या उंचीचे असतात, काही व्यक्ती या सुर्याच्या तेजाएवढ्या तळपत असतात. सुर्यावर थुंकलं किंवा हिमालयाच्या दिशेने तोंड वेंगाडूव दाखवलं म्हणून हिमालयाचं आणि सुर्याचं महत्वं कमी होत नाही. हे नशेबाज लोक असतात. यांनी कुणातरी वेगळीच नशा चढवली आहे. प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक असतात. खिडकी उघडले की हे सगळे वाहून जातील अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut About Shivsena Public Meeting
शिवसेनेची मुंबईत सभा; उद्धव ठाकरे कुणाच्या चेहऱ्यावरचे मास्क काढणार?

अशी आहे शिवसेनेच्या सभेची तयारी

शिवसेनेनं १४ मे म्हणजेच आज संध्याकाळी सात वाजता बीकेसीतील मैदानावर भव्य सभेचे आयोजन केले आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संबोधित करणार आहेत. या सभेची त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोन ते अडीच लाख लोक बसतील अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. ३६ एलईडी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत. सभेला मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ही सभा अभूतपूर्व करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. (Shivsena Public Meeting in BKC)

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com