"भारत मनुस्मृतीच्या नव्हे बाबासाहेबांच्या कायद्याप्रमाणे चालतो, म्हणून आम्ही हिजाबचे समर्थन करतो"

पुणे : कर्नाटकात महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घातल्याने त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रत पहायला मिळतं आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी MIM ने हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केली असतानाच आता या वादात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील उडी घेतली आहे.
"भारत मनुस्मृतीच्या नव्हे बाबासाहेबांच्या कायद्याप्रमाणे चालतो, म्हणून आम्ही हिजाबचे समर्थन करतो"
"भारत मनुस्मृतीच्या नव्हे बाबासाहेबांच्या कायद्याप्रमाणे चालतो, म्हणून आम्ही हिजाबचे समर्थन करतो"Saam TV

पुणे : कर्नाटकात महाविद्यालयांमध्ये हिजाब (Hijab) घालण्यावर बंदी घातल्याने त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रत पहायला मिळतं आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी MIM ने हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केली असतानाच आता या वादात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (Republican Party of India) देखील उडी घेतली आहे.

भारत देश मनुस्मृतीच्या कायद्याने चालत नाही तर संविधानाप्रमाणे (Constitution) चालतो म्हणूनच आम्ही हिजाबचे (Hijab) समर्थन करत असल्याचे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केलं आहे.

"भारत मनुस्मृतीच्या नव्हे बाबासाहेबांच्या कायद्याप्रमाणे चालतो, म्हणून आम्ही हिजाबचे समर्थन करतो"
दुर्दैवी : कुत्र्याला मारण्यासाठी टाकलेली विषारी बिस्कीट खाल्ल्याने 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

ते म्हणाले, 'भारत देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी लिहलेल्या संविधानावर चालतो आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र दिले आहे. कर्नाटक मध्ये झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे त्याचा निषेध करीत असून याच मनुवादी विचाराच्या लोकांनी सावित्रीमाई असाच त्रास दिला होता आणि आज यांचेच लोक मुलीच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत त्यामुळे भारत देश मनुस्मृतीच्या कायद्याने चालत नसून संविधानाने चालतो त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष हिजाबला आणि मुस्कानला पूर्णपणे समर्थन देत असल्याचे खरात यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com