Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातूनही घालवू!, आमदारांना दिला शब्द

Uddhav Thackeray : भाजप फोडाफोडीचे राजकारण करतंय, हे लोकांना आवडलेले नाही. कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातून घालवू, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.
Uddhav Thackeray Latest News In Marathi/@ShivSenaUBT/Twitter
Uddhav Thackeray Latest News In Marathi/@ShivSenaUBT/TwitterSAAM TV

निवृत्ती बाबर, मुंबई

Uddhav Thackeray On Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे. सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला धोबीपछाड दिला आहे. निवडणूक निकाल कर्नाटकाचा असला तरी, रण मात्र महाराष्ट्रात पेटलं आहे. विरोधी पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी मुंबईत 'मातोश्री'वर ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीतही कर्नाटक निवडणूक निकालावर चर्चा झाली.(Latest Marathi News)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) निकाल दिल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर विस्तृत चर्चा झाली असली तरी, कर्नाटकाच्या निकालाचा मुद्दाही चर्चिला गेला.

Uddhav Thackeray Latest News In Marathi/@ShivSenaUBT/Twitter
Sharad Pawar On Karnataka Election Result: 2024 च्या निवडणुकांमध्ये देशात काय होईल? कर्नाटक निकालावरून शरद पवार यांनी दिले महत्वाचे संकेत

उद्धव ठाकरेंचा आमदारांना विश्वास

या बैठकीला उपस्थित शिवसेना गटाच्या आमदारांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिल्याचे कळते. दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला आहे. भाजपला कर्नाटकात नाकारलं आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करतंय, हे लोकांना आवडलेले नाही. कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातून घालवू, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

Uddhav Thackeray Latest News In Marathi/@ShivSenaUBT/Twitter
DK Shivkumar: एक दिवस प्रचार अन् 1 लाखांनी विजय! पंतप्रधानांचाही पराभव; कोण आहेत जायंट किलर DK शिवकुमार?

पुढील आठवड्यात जिल्हाप्रमुखांची बैठक

मातोश्रीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याचे सांगितले जाते. सुप्रीम कोर्टाच्या सत्तासंघर्षावरील निकालानंतर ही बैठक झाली. या बैठकीत कोर्टाच्या निर्णयावरून आमदारांच्या शंकाचे निरसन करण्यात आलं. कोर्टाच्या निर्णयानंतर आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.

पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती समजते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com