Weather Updates: पुढील दोन दिवस महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Weather Updates: पुढील दोन दिवस महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता
Rain News, Maharashtra Weather Updates, Weather News UpdatesSaam Tv

मुंबई: राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी जोरदार वारे असणार आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Updates)

३ आणि ४ मे रोजी विजांच्या कडकडाट‌ व गडगडाटासह, हलका ते मध्यम पावसासह जोरदार वारे (३०-४० किमी प्रतितास) काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.

 Rain News, Maharashtra Weather Updates, Weather News Updates
Summer: औरंगाबादचा पारा आठवडाभरात 43 अंशांपर्यंत जाणार - हवामान विभाग

या जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यातील विविध विभागात ३ आणि ४ मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Updates)

३ मे

३ मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसासह उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

४ मे

३ मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर ५ मे रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. (Weather Updates)

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com