मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं चाललंय काय? मंत्रालयातील सचिवांसोबत व्हीसीद्वारे बैठक

राज्यात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं चाललंय काय? मंत्रालयातील सचिवांसोबत व्हीसीद्वारे बैठक
Uddhav ThackeraySaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : राज्यात मागील ३ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्य सरकार कोसळते की काय अशी शक्यता निर्माण झाली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अॅक्टीवमोडमध्ये आले आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला भावनिक साद घातली.

मला सत्तेची हाव नाही मी खुर्चीला चिटकून बसणाऱ्यातला नाही, शिवाय आपण वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडणार असल्याची घोषणा करत त्याने रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरुन मातोश्रीवर आले. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी सहानभुती निर्माण झाली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान,या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयातील विभागांच्या सचिवांसमवेत बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवाय सरकारला मागील अडीच वर्षांत केलेल्या सहकार्याबद्दल सचिवांचे आभार मानणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक Online होणार असून दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री मंत्रालयातील विभागांना संबोधित करणार आहेत. मात्र, ही बैठक शेवटची तर नाही ना? अशी चर्चा सुरु झाल्या आहेत.

शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडत महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे.एकीकडे शिंदे यांच्याकडील आमदारांची संख्या वाढतं आहे. त्यामुळे आघाडी सरकारचा धोका वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी आजची बैठक का आयोजित केली आहे याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com