'सदावर्ते मराठा आरक्षणावर मीठ चोळतायत; त्यांचा ST संपाशी संबंध काय?' (पहा Video)

अॕड. सदावर्ते यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनात संबंध काय? तसेच एसटी कामगारांच्या आंदोलनात 'एक मराठा, लाख मराठा' म्हणून हे मराठा आरक्षणावर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.
'सदावर्ते मराठा आरक्षणावर मीठ चोळतायत; त्यांचा ST संपाशी संबंध काय?' (पहा Video)
'सदावर्ते मराठा आरक्षणावर मीठ चोळतायत; त्यांचा ST संपाशी संबंध काय?' (पहा Video)SaamTV

पुणे : अॕड. गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनात संबंध काय? तसेच एसटी कामगारांच्या आंदोलनात 'एक मराठा, लाख मराठा' म्हणून हे मराठा आरक्षणावर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

पहा व्हिडीओ -

एसटी महामंडळाचे (ST Corporation) राज्य शासनामध्ये विलिनीकरण करा या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानात मागील 16 वसांपासून तर त्याहून जास्त दिवसांपासून राज्यभर सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र आता त्यांच्या नेत्यांनी देखील आंदोलनातून काढता पाय घेत असल्याची घोषणा आ. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत (Gopichand Padalkar, Sadabhau Khot) यांनी केली. मात्र त्याचवेळी पहिल्यापासून कर्मचाऱ्यांच्या बाजूने कोर्टात बाजू मांडणारे अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते विलिनीकरणाच्या मागणीवरतीच ठाम असल्याचे सांगत राज्य सरकारसह भाजपवरती (BJP) सडकून टीका केली.

'सदावर्ते मराठा आरक्षणावर मीठ चोळतायत; त्यांचा ST संपाशी संबंध काय?' (पहा Video)
धक्कादायक : शासन निर्णय न पटल्याने ST कर्मचाऱ्याने काचेवरती मारला हात; हाताच्या नसा तुटल्या

तसेच त्यांनी यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील त्यांच्या पत्रकार परिषदेत दिल्या आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती संभाजी ब्रिगेडने सदावर्तेंवरती टीका केली आहे. 'ST कामगारांच्या आंदोलनात 'एक मराठा, लाख मराठा' म्हणून हे मराठा आरक्षणावर मीठ चोळण्याचे काम करत असून सदावर्ते यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनात संबंध काय? असा सवाल उपस्थित करत याच माणसाने 'मराठा आरक्षण' रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. असून हे सुपारी फंटर असल्याची' जहरी टीका देखील संभाजी ब्रिगेडने केली आहे.

तसेच सुडबुद्धीच्या राजकारणात एस.टी. कामगारांचे आंदोलन भरकटवले जात आहे. 'एसटी कामगारांचा 'गिरणी कामगार' होऊ नये' एवढीच माफक अपेक्षा असल्याचे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केले आहे. शिवाय एस.टी. कामगारांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असेही ते म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com