निर्बंध शिथील करुन काय उपयोग? लोकल बंदमुळे कामगारच येईनात; 'व्यापाऱ्यांचा सवाल'

सरकारने व्यापारी वर्गांना दुकानं ज्यादा वेळ खुली करण्यासाठी निर्बंध शिथील केले आहेत, माञ दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला लोकलचा प्रवास बंद असल्याने या शिथिलीकरनाचा उपयोग काय असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत.
निर्बंध शिथील करुन काय उपयोग? लोकल बंदमुळे कामगारच येईनात; 'व्यापाऱ्यांचा सवाल'
निर्बंध शिथील करुन काय उपयोग? लोकल बंदमुळे कामगारच येईनात; 'व्यापाऱ्यांचा सवाल'Saam Tv

मुंबई : मुंबईत कोरोना संक्रमण नियंञणात आल्यानंतर सरकारने व्यापारी वर्गांना दुकानं ज्यादा वेळ खुली करण्यासाठी निर्बंध शिथील केले आहेत, माञ दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला 'लोकल ट्रेन'चाLocal प्रवास बंद असल्याने या निर्बंधांमधील शिथीलीकरनाचा उपयोग काय असा प्रश्न व्यापारीMerchant विचारताय आहेत.What's the use of relaxing restrictions? No workers due to local closure

मुंबईत कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंञणात आल्यामुळे मुंबईत 'ब्रेक दि चेन'Break the chain अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत. सर्व दुकान व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस दुकानं राञी 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. माञ दुकानात काम करणारे कर्मचारी हे लांब राहतात. प्रवासतचTravelling त्यांचा 3 तास वेळ जातो. याचा परिणाम व्यवसायांवर होतं आहे. त्यामुळे दुकाने उघडली तरी कर्मचाऱ्यांअभावीWorkers आम्हालाच सर्व कामी करावी लागत आहेत.

हे देखील पाहा-

दुकानात काम करणारे बहुतांश कर्मचारी हे मुंबईबाहेरून येतात. लोकल बंद असल्यामुळे त्यांना बसवे प्रवास करावा लागत आहे. वेळेत पोहचण्यासाठी सकाळी 6 वा घर सोडावं लागतं. त्यानंतर बसमधला गर्दीचाBus Crowded तीन तासाचा प्रवास करत याव लागत असल्याचे कर्मचारी सांगतात.

निर्बंध शिथील करुन काय उपयोग? लोकल बंदमुळे कामगारच येईनात; 'व्यापाऱ्यांचा सवाल'
झिका विषाणूचा रुग्ण आढळलेल्या बेलसर येथे प्रशासनाकडून उपायोजना

मागील दीड ते दोन वर्षांपासून सर्व सामान्यांसाठी लोकलची सेवा बंद आहे. तळहातावर पोट असलेल्या अनेकांची नोकरी गेलेली आहे. तर जे कर्मचारी कामाला जात आहेत. त्यांना तारेवरची कसरत करून कामाला यावे आणि जावे लागत नाही. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांच्यावर अशात कामावर न आल्यास घर कसे चालणार याची चिंता त्यांना सतावत आहे. तर कोरोनामुळे आधीच नागरिकांनी दुकानाकडे पाठ फिरवली आहे. कामगारांना पगार देताना दमछाक होत आहे. या सर्व गोष्ठी सरकारने लक्षात घ्यायला हव्यात आणि सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू करावी अशी मागणी दुकान व्यावसायिक करत आहेत.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com