'तो' फोटो व्हायरल केल्याप्रकरणी प्रताप सरनाईकांवर कारवाई कधी? सोमय्यांचा गृहमंत्र्यांना सवाल

'मंत्रालयात फोटो काढणे मनाई आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई कधी करणार?'
'तो' फोटो व्हायरल केल्याप्रकरणी प्रताप सरनाईकांवर कारवाई कधी? सोमय्यांचा गृहमंत्र्यांना सवाल
Kirit SomaiyaSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : शिवसेनेचे नेते लीलावती हॉस्पिटलमधील फोटो कालपासून व्हायरल झाला असं म्हणत आहेत. मी मंत्रालयात गेलो होतो तेव्हाचे फोटो व्हायरल केले. त्याची नोटीस मला दिली होती. मात्र, प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई का झाली नाही. मंत्रालयात फोटो काढणे मनाई आहे. प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्यावर राज्याचे गृहमंत्री कारवाई कधी करणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

ते आज अर्थ एनजीओचे प्रवीण कलमे (Pravin Kalame) यांच्याविरुद्ध फसवणूक, सरकारी कागदपत्रांची चोरी केल्याबद्दल अजामीनपात्र वॉरंटचा पाठपुरावा आणि तक्रार नोंद करण्यासाठीते वांद्रे येथील निर्मल नगर पोलिस स्टेशनमध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी म्हणाले, महिना भरापूर्वी १ एप्रिलला प्रवीण कलमे यांनी पेपर चोरी केली. प्रवीण कलमेला पलायन करायला दिले. आज ४० दिवस झाले तो फरार आहे. त्याला फरार घोषित करायला हवे. प्रवीण कलमेला अटक का नाही? तो उद्धव ठाकरे यांचा जावई आहे का? प्रवीण कलमेने जो गुन्हा केला तो नॉन बेलेबल आहे. त्याला अटक करावी अशी मी आज पोलिसांकडे मागणी केली असल्याचं सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितलं.

तसंच मेट्रो डेरी काय आहे याचे कागद मीडियाने पाहिले आहेत का? संजय राऊत (Sanjay Raut) काय बोलतात हे उद्धव ठाकरेंना फक्त माहीत आहे. मेट्रो डेअरी ही पश्चिम बंगालची सरकारी कंपनी आहे. उद्धव ठाकरे यांना जेवड्या चौकशा कराव्यात तेवढ्या कराव्यात, संजय राऊत साडे चार महिने बोलत आहेत पण पुरावे काय आहेत. त्यांना प्रश्न विचारायची तुमची हिंमत नाही मला विचारता असं सोमय्या पत्रकारांना म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.