जनावरांची कुट्टी जिवावर बेतली; मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू
जनावरांची कुट्टी जिवावर बेतली; मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यूरोहिदास गाडगे

जनावरांची कुट्टी जिवावर बेतली; मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव Ambegaon Pune तालुक्यातील लाखनगाव येथे 21 वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे.

रोहिदास गाडगे

पुणे: पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव Ambegaon Pune तालुक्यातील लाखनगाव येथे 21 वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे. सोनाली दौंड असं मृत नवविवाहितेचे नाव आहे.

हे देखील पहा-

जनावरांना कुट्टी करत असताना कुट्टी मशीन मध्ये स्कार्प आणि केस गुंतल्याने या नवविवाहितेला गळफास लागल्याने दुर्दैवी रित्या मृत्यू झाला असून सोनालीचे नुकतेच सहा महिन्यापुर्वी लग्न झालं होतं. त्यामुळे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जनावरांची कुट्टी जिवावर बेतली; मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू
अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल; पत्नीने केले मारहाणीचे आरोप

सोनाली जनावरांना चारा तयार करण्यासाठी गेली यावेळी कुट्टी मशिन सुरु असताना अचानक अंगावरील स्कार्प चाऱ्याबरोबर कुट्टीमशिनमध्ये गेले यावेळी स्कार्पबरोबर डोक्याचे केसही कुट्टी मशिनमध्ये गेले काही क्षणातच ही, दुदैवी घटना घडली महिलेच्या मृत्युनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.