Mumbai : जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही - मुख्यमंत्री

'स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात. माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री'
Mumbai : जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही - मुख्यमंत्री
Mumbai : जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही - मुख्यमंत्रीSaam TV

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 24 तास ही सुविधा उपलब्ध 8999-22-8999 या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणाऱ्या BMC च्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ (WhatsApp) सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मकर संक्रांतीच्या राज्यातील शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले, गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील, आजचा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस, म्हटले तर क्रांतीचा दिवस असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी केलं.

हे देखील पहा -

शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा उपक्रम असल्याचं ते म्हणाले. माझी महापालिका, माझे सरकार, त्याच्याशी माझा सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते. ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारी आजची बाब असून मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात. आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका जिने जनतेला 80 हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या आहेत. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली जाणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे त्याचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचा विचार व्हावा सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खुप अग्रेसर पण त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का, याचा विचार करायला हवा. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही.

Mumbai : जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही - मुख्यमंत्री
राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे - चंद्रकांत पाटील

मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे. वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली 500 चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ, मग कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना 80 सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे.

जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने (BMC) त्याकडे लक्ष द्यावे, महापालिका आयुक्तांना सुचना, महापालिका म्हणजे नेमके काय, तिचे काम काय आहे हे जनतेला समजून सांगावे, महापालिकेवरचा कामाचा ताण करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे.

स्वत: काही करायचं नाही आणि पालिकेला प्रश्न वितारतात -

महापालिका रोज काय काम करते, रोज गटार साफ करते, कचरा उचलते, रोज पाणी देते, धरणे बांधणे असेल ही सगळी कामे महापालिका कसे करते, घाणीत उतरून सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी. ही माझी महापालिका आहे आणि ती देशातील सर्वात उत्तम महापालिका आहे कारण ती जगातील उत्तम तंत्रज्ञान आणि सुविधा मला उपलब्ध करून देते याचा अभिमान वाटावा असा हा क्षण असून कोविड (Covid-19 काळात महापालिकेचे काम कौतूकास्पद असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात. माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री. त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतूक जागतिकस्तरावर. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे मी वचन देतो असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com