संदीप देशपांडेंच्या मनातला 'रँड' कोण???

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ब्रिटीश भारतातील क्रुर अधिकारी 'वॉल्टर रँड'ची उपमा दिली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
संदीप देशपांडेंच्या मनातला 'रँड' कोण???
संदीप देशपांडेंच्या मनातला 'रँड' कोण???Saam Tv News

मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ब्रिटीश भारतातील क्रुर अधिकारी 'वॉल्टर रँड'ची उपमा दिली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं एक वादग्रस्त ट्विट. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता मुख्यमंत्र्यांना थेट रँड या ब्रिटीश क्रूर अधिकाऱ्याची उपमा दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. (Who is 'Walter Charles Rand' in the mind of Sandeep Deshpande?)

हे देखील पहा -

नक्की काय म्हणाले संदीप देशपांडे?

''प्लेग ची साथ आहे या नावावर 1897 साली रँडने जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चापेकर बंधूनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँड ला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित.'' असं ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्याना नाव न घेता थेट रँडची उपमा दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत जनता आधुनिक रँड ला धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

राज्यात कोरोना महामारीमुळे गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांवर, सार्वजनिक सभांवर, धार्मिक स्थळांवर बंदी आहे. त्यामुळे ही धार्मिक स्थळं विशेषतः मंदिरं उघडण्यासाठी भाजपसह मनसेदेखील आक्रमक झाली आहे. काल ३१ ऑगस्टला देखील दहिहंडी साजरा करण्यावरुन ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये खटके उडाले होते. मनसैनिकांनी अनेक ठिकाणी गनिमी कावा करत दहिहंडी साजरा केली होती. त्यानंतर मनसेच्या अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यामुळे संदीप देशपांडे देखील आक्रमक झाले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संदीप देशपांडे यांना "साम टीव्हीशी" बोलताना अश्रू अनावर झाले होते. त्यात ते कोरोनाच्या भयंकर परिस्थितीबाबत बोलत होते. आता मात्र ते स्वतःच मंदिरं उघडण्यासाठी आणि सण-उत्सव साजरा करण्यासाठी आक्रमकपणे बोलत असतात. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांचा तो जुना व्हिडिओ व्हायरल करत त्यांना ट्रोलही केले होते.

रँड आणि चापेकर बंधू काय प्रकरण आहे?

पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी सिवील सर्विस अधिकारी वॉल्टर चार्ल्स रॅंडला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चापेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली. दामोदर चापेकर यांनी गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या.

संदीप देशपांडेंच्या मनातला 'रँड' कोण???
तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह टांगून शहरातून फिरवलं? VIRAL VIDEO मागील सत्य

रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदर चापेकर यांचे बंधू बाळकृष्ण यांनी रँड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले होते. चापेकर बंधूंवर आणि रॅंडच्या हत्येच्या घटनेवर '२२ जून १८९७' हा मराठी चित्रपट आला होता.

स्त्रोत: विकिपीडिया

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com