ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला; त्यांचेच समर्थन संजय राऊत करतायत - नितेश राणे

3 तलाकचा विरोध या रझा अकदमीने केला. यांनी कोरोना लसीकरणाला विरोध केला. फ्रांसच्या राष्ट्रपतीच्या भाषणाला देखील रझा अकादमीने विरोध केला.
ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला; त्यांचेच समर्थन संजय राऊत करतायत - नितेश राणे
ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला; त्यांचेच समर्थन संजय राऊत करतायत - नितेश राणे SaamTV

मुंबई : 12 तारीखला राज्यात विविध ठिकाणी मुस्लीम समाजाकडून (Muslim society) निघालेले मोर्चे आणि त्यानंतर उसळलेला हिंसाचार तसेच दुसऱ्या दिवशी भाजपने (BJP) पुकारलेला बंद आणि यावेळी देखील झालेल्या जाळपोळच्या घटना आणि त्यावरुन आलेल्या राजकिय नेत्यांच्या प्रतिक्रिया या सर्वांवकती भाजपा आमदार नितेश राणें (BJP MLA Nitesh Rane) यांनी वक्तव्य केलं.

हे देखील पहा -

'महाराष्ट्रात12 तारीखला जो मोर्चा झाला तो रझा अकादमीने (Raza Academy) काढला होता. मोर्चा काढताना त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्यासाठी काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र रझा अकादमीच्या लोकांनी एक फोटो दाखवावा की त्रिपुरामध्ये हिंदूंनी मस्जिद पाडली. त्रिपुराच्या DG नी तेव्हाच सांगितले हे सत्य नाही. मग राज्यात मोर्चा का काढला ? मोर्चा शांतप्रिय काढायला हवा होता हिंदूंना का मारलं ? या प्रश्नांचे उत्तर राज्य सरकार रझा अकादमीला का विचारत नाहीत. रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे. हे मी फार जाणीवपूर्वक म्हणतो जशा अतिरेकी संगटना काम करतात तशीच ही संघटना काम करत आहे. मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम ही रझा अकादमी करते' असं वक्तव्यं राणेंनी आपल्या पत्रकार परिषदेत केलं.

ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला; त्यांचेच समर्थन संजय राऊत करतायत - नितेश राणे
Raza Academy : "मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचे काम रझा अकादमी करते"

तसेच रझा अकादमीचा संस्थापक अफगाणिस्तानात राहतो. मुंबईत मनीष मार्केटमध्ये (Manish Market) यांचे कार्यालय आहे हे लोक काय समाजसेवी काम करतात का? 3 तलाकचा (Tripple Divorce) विरोध या रझा अकदमीने केला. यांनी कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) विरोध केला. फ्रांसच्या राष्ट्रपतीच्या भाषणाला देखील रझा अकादमीने विरोध केला. एवढच नव्हे मुंबईमध्ये 12 ऑगस्टला या रझा अकादमीने धिंगाणा घातला होता. 1997 मध्ये याच रझा अकादमीने बाळासाहेबांना विरोध केला होता. त्याच रझा अकादमीचे समर्थन संजय राऊत करतात अस ते आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

दरम्यान तुमच्या वडिलांचा ज्यांनी विरोध केला त्यांना तुम्ही मांडीवर का बसवता हेच का तुमचे पुत्र प्रेम तुम्हाला राज्यात जातीय दंगली घडवायच्या होत्या का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना (CM) नाव न घेता केला. शिवाय राज्यातील वातावरण खराब करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे हा माझा थेट आरोप असून अशा पध्दतीचा एक जरी मोर्चा निघाला तरी हिंदूचे मोर्चे निघतील असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com