Cyrus Mistry : सायरस मिस्त्री कोण होते? TATA ग्रुपशी त्यांचे काय संबंध होते?

सायरस मिस्त्री कोण होते? असा अनेकांना प्रश्न पडलाय.
cyrus mistry vs ratan tata
cyrus mistry vs ratan tataSaam Tv

Who was Cyrus Mistry? : टाटा उद्योगसमुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या मर्सिडिज कारला अपघात (Accident) झाला. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सायरस मिस्त्री कोण होते? असा अनेकांना प्रश्न पडलाय. याबाबतची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. (Cyrus Mistry Latest News)

cyrus mistry vs ratan tata
Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्रींचा कार अपघात नेमका कसा घडला ? महत्वाची माहिती समोर

सायरस मिस्त्री कोण होते?

सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडिल पल्लोनजी मिस्त्री एक नामवंत उद्योगपती होते. सायरस यांनी आपले शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमधून पूर्ण केले. ते २००६ मध्ये पहिल्यांदा चर्चेत आले. २००६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. टाटा समूहाचा कारोभार त्यांनी व्यवस्थितरित्या सांभाळला. त्यानंतर अचानकपणे त्यांना या पदावरून हटवण्यात आले.

सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून का हटवलं होतं?

सायरस मिस्त्री यांना त्यावेळी टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यामागचे कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री अध्यक्ष झाल्यानंतर टाटा समुहाचा कोणताही निर्णय मंडळाच्या सदस्यांशी सल्लामसलत न करता घेण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर ते न्यायालयात गेले, मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला होता. (Cyrus Mistry Marathi News)

सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील वाद

तो काळ निवडणूकीचा होता. निवडणुक निधीच्या मुद्द्यामुळे रतन टाटा यांचे आणि मिस्त्रीसोबत खटके उडायला लागले. मिस्त्रींच्या एका सल्लागाराने ओडीसाच्या २०१४ विधानसभा निवडणुकांमध्ये १० कोटी रुपयांचा निधी गुंतवावा असं सुचवलं होतं. ओडीसामध्ये TATA च्या मालकीची सगळ्यात मोठी लोखंडाची खाण आहे आणि सरकारच्या बाजूला राहले की आपला फायदा होईल मात्र याला TATA Sons च्या बोर्ड मेंबर्सनी विरोध दर्शवला.

कारण TATA फक्त संसदीय निवडणुकीमध्ये गुंतवणूक करायची असा नियम होता. त्यावेळी मिस्त्री यांच्या मनाप्रमाणे काहीही झाले नाही मात्र. इथूनच मिस्त्री आणि रतनजी यांच्यातील खटके उडू लागले. त्यानंतर आर्मीचं कंत्राट असो की TATA आणि Welspun करार यांच्यातील वाद वाढतच होते. मिस्त्रींनी DOCOMO शी ताणलेला वाद असो की कामगारां सोबतचं तुटायला आलेलं नातं असो, यामुळे रतनजींसमोर चिंता वाढली होती. अखेर त्यांनी २०१६ ला मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवले.

सारयरस मिस्त्री सध्या काय करत होते?

सायरस मिस्त्री हे सध्या शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. हा उद्योग सायरस यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी १९३० मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील १८.५ % हिस्सा खरेदी केला होता. मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे, ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे. याशिवाय ६६% हिस्सा टाटा समूहाच्या विविध ट्रस्टकडे आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com