Shivsena : दसरा मेळाव्याचा मुद्दा आता हायकोर्टात; शिवाजी पार्क कुणाला? उद्या सुनावणी

शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
Maharashtra Politics, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maharashtra Politics, Eknath Shinde, Uddhav ThackeraySaam Tv

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यातच आता दसरा मेळाव्याबाबतचा हा वाद हायकोर्टात पोहचला आहे. पूर्व परवानगी मागूनही पालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या म्हणजेच गुरूवारी सुनावणी होणार आहे.

शिवाजी पार्कवर (Dasara Melava) दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेनं (Shivsena) गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा दसरा मेळाव्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला होता. शिवाजी पार्कवर आपणच दसरा मेळावा घेणार असं दोन्ही गटांच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. (Shivsena Crisis Latest News)

Maharashtra Politics, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Gujrat Election : गुजरात निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली; शेलारांवर सोपवली मोठी जबाबदारी

त्यामुळे परवानगी नेमकी कुणाला द्यावी याबाबत महापालिकेला अद्यापही निर्णय घेता आलेला नाहीये. दरम्यान, दसरा मेळावा घेण्याबाबत आता शिवसेनेकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याचीही मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील जोएल कार्लोस यांच्या वतीने ही याचिका केली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली. आता, हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्याची परवानी कुणाला मिळणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागलंय.

Maharashtra Politics, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde : वेदांता प्रकल्पावरून शिंदे एकटे पडलेत? दिल्ली दौऱ्यावर भाजपचा एकही नेता नाही!

दसरा मेळाव्याआधीच ठाकरेंची तोफ धडाडणार

आज म्हणजेच बुधवारी (२१ सप्टेंबर) गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असून शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. त्यामुळे पक्षाची आगामी भूमिका कशी असेल? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

या मेळाव्यासाठी सुमारे ३५००० जण मावतील असा मोठा हॉल बुक करण्यात आला आहे. यावेळी करत चलो गोरेगाव असा नारा देत शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होतील. मुंबईतील शिवसेना नेते, विभागप्रमुख,शिवसेना उपनेते, विधानसभा संघटक,विधानसभा समन्वयक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी मुंबईचे सुमारे ३० ते ३५ हजार पुरुष व महिला पदाधिकारी यावेळी सहभागी होणार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com