Shivsena Hearing : खरी शिवसेना नक्की कुणाची? ३ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात होणार फैसला

shivsena supreme court hearing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतही शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली होती.
shiv sena supreme court hearing
shiv sena supreme court hearingSaam Tv

मुंबई: एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गट अशा दोन भागात पक्ष विभागला गेला. शिवसेना नक्की कुणाची याबाबत उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना गट यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतही शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी आता येत्या ३ ऑगस्टला होणार आहे. यापूर्वी ही सुनावणी १ ऑगस्टला होणार होती, मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. (Shivsena Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्टला मुख्य न्यायाधीश NV एन. व्ही. रमना (CJI N. V. Ramana), न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर शिवसेनेच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या (शिंगे गटाच्या) याचिकेवर निवडणूक आयोगाच्या कारवाईविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने याचिका दाखल केली होती, यावर सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी होणार होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाला स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आयोगाने दोन्ही पक्षांकडून त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे मागवले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने यावर स्थगिती आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

देशातील सर्वोच्च न्यायालयाने २० जुलैला म्हटले होते की, महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय संकटाच्या वेळी शिवसेना आणि त्यांच्या बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये राजकीय पक्षाचे विभाजन, विलीनीकरण, पक्षांतर आणि अपात्रता यासह अनेक घटनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत. यावर विचार करण्यासाठी खंडपीठाची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होती, तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणावर सुनावणी न घेण्यास सांगितले कोर्टाने सांगितले आहे.

shiv sena supreme court hearing
Shivsena: सामान्य शिवसैनिकांवर दबाव टाकाल तर...; ठाण्याच्या दिघेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

महाराष्ट्रातील राजकीय संकटाशी संबंधित सहा याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. शिंदे गट आणि भाजप युतीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ३० जूनच्या निर्णयाला आणि त्यानंतर विधानसभेत होणाऱ्या चाचणीलाही याचिकांमध्ये आव्हान देण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com