ST Bus Strike: आत्महत्या कशाला करता २-३ जणांना सोबत घेऊन जाऊ - नितेश राणे

नितेश राणेंनी परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार सुप्रिया सुळे यांसह ठाकरे सरकारवर कडक शब्दांत टीका केलीय.
ST Bus Strike: आत्महत्या कशाला करता २-३ जणांना सोबत घेऊन जाऊ - नितेश राणे
ST Bus Strike: आत्महत्या कशाला करता २-३ जणांना सोबत घेऊन जाऊ - नितेश राणेSaam Tv

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Bus Strike) सुरु आहे. या संपाचा आजचा पाचवा दिवस असून आत्तापर्यंत शेकडो एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये (Azad Ground Mumbai) सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) सहभागी झाले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार सुप्रिया सुळे यांसह ठाकरे सरकारवर कडक शब्दांत टीका केली. (Why commit suicide and take 2-3 people with you said MLA Nitesh Rane)

हे देखील पहा -

नितेश राणे म्हणाले की, मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरून द्या मी अनिल परब यांच्या घरी नेऊन सोडतो. अनिल परब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे पण आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला हे कळत नाही, हा संशोधनाचा विषय आहे अशी बोचरी टीका केली. पुढे ते म्हणाले की, आज मुख्यमंत्र्यावर शस्त्रक्रिया झाली, पण उद्धव ठाकरेंना कणा दिला आहे का? असा प्रश्न पडतो. जेव्हा शाहरुखचा मुलगा जेलमध्ये असताना यांना झोप देखील लागत नाही. राष्ट्रवादीच्या ताईला आर्यनवर वाईट वाटतं पण आमच्या एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आणि भगिनींबद्दल काही वाटत नाही.

विलीनीकरण झाले तर अनिल परब कशी वसुली करणार, अनिल परबांना काही पाठवायचे असेल तर बदाम पाठवा, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, डोक्यावर चार-पाच केस राहिले म्हणून त्यांना काही कळत नाही. २०१४ ते २०१९ मध्ये तुमचेच दिवाकर रावते परिवहन मंत्री होते, ते काय एमआयएमचे होते का? यांची आपसात काही चर्चा होत नसावी. हे जी वसुली करतात ती सर्व उद्धव ठाकरेंना द्यावी लागणार. कर्मचाऱ्यांनो तुम्ही आत्महत्या का करता? या सरकारमधील एक ते दोन लोकांना घेऊन जाऊ की. तुम्ही आत्महत्या का करता? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र पेटवू असं नितेश राणे एसटी कर्मचाऱ्यांना म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आपण शिवरायांच्या राज्यात राहतो. आत्महत्या हा पर्याय नाही. 93 च्या ब्लास्टमधील मंत्री सरकारच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. जर कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याची गाठ नितेश राणे सोबत आहेत. निलंबन केल्यानंतर हे मंत्री कसे राज्यात फिरतात ते आम्ही बघतो. हिंमत असेल तर या आझाद मैदानात असं आवाहन त्यांनी सरकारला दिलं आहे.

ST Bus Strike: आत्महत्या कशाला करता २-३ जणांना सोबत घेऊन जाऊ - नितेश राणे
कुणाला तरी खुश करण्यासाठी ईडीने अफवा पसरवू नये - नवाब मलिकांचा ईडीला टोला

जेव्हा कोरोना काळात मुख्यमंत्री घरात बसले होते, तेव्हा हे कामगार रस्त्यावर होते. उगाच पट्टा लावायला लागला नाही किती सोनिया गांधींसमोर झुकायचे, वाकून वाकून पट्टा लावायला लागला. अनिल परब तुम्ही कुठे लांब जाणार नाही, तुम्हाला आमच्या समोर उभ रहावं लागणार, आम्ही विधानसभेत आयुध वापरणार. महामंडळाचे अध्यक्ष हे फक्त भाषण आणि मुलाखती देतात, ठाकरे आडनाव लावले म्हणून बाळासाहबे होत नाही. बाळासाहबे कुठे हे कुठे? नाहीतर उगाच रक्त चेक करायला लागेल अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com