Shraddha Walkar Case: श्रद्धाच्या पत्राची महाराष्ट्र पोलिसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांची चौकशीची मागणी

भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलिस या विषयावर थंड का बसले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Ahish Shelar
Ahish ShelarSaam TV

मुंबई : आफताबच्या जाचाला कंटाळून श्रद्धाने पोलिसात तक्रार केल्याची माहिती आता समोर येत आहे. ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला करण्याची भीती तिनं आफताबविरुद्ध पत्राद्वारे महाराष्ट्र पोलिसांत केली होती, अशी माहिती उघड झाली आहे. याच मुद्द्यावरुन भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलिस या विषयावर थंड का बसले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आशिष शेलार यांनी म्हटलं की, नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्रातील एक भगिनीचा खून आफताबने अतिशय क्रूर पद्धतीने केला. त्या सर्वांची चौकशी सुरु असताना आता माध्यमांसमोर एक पत्र आले आहे. त्या पत्रानुसार २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा वालकरने तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. (Latest Marathi News)

Ahish Shelar
Shraddha Walker Case Update : श्रद्धा वालकरनं २ वर्षांपूर्वीच व्यक्त केली होती भीती; लेटर आलं समोर

या पत्राची रिसिव्हड कॉपी देखील माध्यमांवर दिसत आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलिस या विषयावर थंड का बसले? जर आमच्या मराठी भगिनीने तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिल्यावर सुद्धा महाराष्ट्रातील पोलिस या पत्रावर का कारवाई करत नव्हती. श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की तो आफताब होता म्हणून? सरकारमध्ये बसणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरून घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे, असं शेलार यांनी म्हटलं.

Ahish Shelar
Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर प्रकरणी नवा ट्विस्ट; आफताबच्या कबुलीच्या वृत्तावर वकिलांचा नवा खुलासा

तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का, याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com