पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी

पतीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी
पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटल्यानं पत्नी जखमीअजय दुधाणे

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये Ambernath पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटल्याने पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटने प्रकरणी पतीच्या विरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात Shivaji Nagar Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबरनाथच्या चिखलोली पाड्याजवळील पवार सेक्शन भागात उद्योजक अविनाश पवार Avinash Pawar राहतात. पवार यांनी त्यांचे परवानाधारक रिव्हॉल्वर घराच्या एका ड्रॉव्हरमध्ये ठेवले होते.

हे देखील पहा -

दरम्यान अविनाश यांच्या पत्नी अनिता पवार या ड्रॉव्हरमधून रुग्णालयाची फाईल काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्याकडून हे रिव्हॉल्वर चुकून खाली पडले. हे रिव्हॉल्वरमध्ये गोळी असल्याने ते खाली पडताच त्यातून एक गोळी सुटली आणि ती थेट अनिता यांच्या पायाला लागली. ही घटना घडताच घरातील सदस्यांनी धाव घेत अनिता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अनिता यांच्यावर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी
Nandurbar : नवापूर तालुक्यात तुफान पाऊस; नदी नाल्यांना पूर!

सध्या अनिता यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची महिती देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती अविनाश पवार यांच्याविरोधात आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिव्हॉल्वरची योग्य काळजी न घेतल्याने पोलिसांकडून हे रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com