बायकोला तिकीट दिले नाही म्हणून, नवऱ्याने पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा!

या अफवेमुळे पुणे विमानतळावर चांगलीच खळबळ उडाली.
बायकोला तिकीट दिले नाही म्हणून, नवऱ्याने  पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा!
बायकोला तिकीट दिले नाही म्हणून, नवऱ्याने पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा!SaamTV

पुणे : बायकोला विमानाचे तिकीट Plane Ticket न दिल्याने एका पठ्ठ्याने चक्क विमानामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्याची घटना पुण्यात घडली आहे. विमानात बॉम्ब Plane Bomb असल्याची अफवा पसरवणारा एक संगणक अभियंता Computer engineer असून त्याला पोलिसांनी अटक तर केली मात्र या अफवेमुळे पुणे विमानतळावर चांगलीच खळबळ उडाली होती. (wife was not given a ticket, the husband spread rumors that there was a bomb on the plane)

ॠषीकेश सावंत (वय 28, रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नावं आहे. शुक्रवारी सकाळी ॠषीकेश त्याच्या बायकोला लोहगाव विमानतळावर सोडण्यासाठी गेला होता त्याची पत्नी 16 ऑक्टोबरला पुण्यात परतणार होती. पण धावपट्टीच्या कामामुळे 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळ बंद आहे त्यामुळे सावंत लोहगाव विमानतळावर Lohgaon Airport विमान कंपनीच्या कार्यालयात गेला आणि त्याने 15 ऑक्टोबरचे तिकिट अधिकृत करून देण्याची केली मागणी विमान कंपनीने नकार दिल्यानंतर सावंत संतापला आणि त्याने विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवली.

बायकोला तिकीट दिले नाही म्हणून, नवऱ्याने  पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा!
डीजे वाजवण पडलं महागात; 12 पोलिसांची एक वर्षासाठी वेतनवाढ बंद !

त्याने पसरवलेल्या या अफवेमुळे लोहगावच्या विमान तळावरती एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा यंत्रणांनी बॉम्ब नसल्याची खातरजमा करुण पुन्हा सर्व सुरळीत सेवा सुरु झाल्या मात्र या अफवेमुळे जवळपास रांचीला निघालेल्या विमानाच्या उड्डाणासाठी तीन तास झाला उशीर झाला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com