Cyber Law : राज्यातील सायबर गुन्ह्यांना आळा बसणार; गृहमंत्र्यांच्या बेठकीत महत्वाचे निर्णय

Maharashtra Cyber Law : सायबर हल्ले रोखण्यासाठी सक्षम फायरवॅाल्स तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Maharashtra Cyber Crime
Maharashtra Cyber CrimeTwitter/ @MahaCyber1

मुंबई: राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला (Cyber Crime) आळा घालण्यासाठी गृहमंत्रालयानं आता कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत आणि आणखी काय करायला हवं याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीत घेतला. (Will curb cyber crime in the state; Important decisions in the meeting of Home Minister Dilip Walse Patil)

हे देखील पाहा -

सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाईनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी तसेच सायबर पोलिसांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी या बैठकीत दिले. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगाराला कठोर शासन करण्यासाठी सध्याच्या कायद्यातील कलमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.

सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरची प्रभावी प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच शासनामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना, अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि व्यवस्थेसंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्यात यावी, असेही गृहमंत्री म्हणाले आहेत. सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी राज्यात सायबर पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रभावीपणे सायबर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे सायबर गुन्हे शोधून काढण्यासाठी राज्यातील पोलीस दलाला व्यापक यंत्र सामग्री मिळाली आहे, तिचा परिपूर्ण वापर करावा तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

Maharashtra Cyber Crime
सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार अर्ज कोर्टाकडून मंजूर;अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार ?

धार्मिक भावना भडकाविणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रकार घडल्यास त्यांना तात्काळ अटकाव करावा लागतो यासाठी सायबर स्पेसवरुन संबंधित मजकूर हटविणे आवश्यक असते. सायबर हल्ले रोखण्यासाठी सक्षम फायरवॅाल्स तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे आता राज्यात सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com