
Mumbai Latest News : मुंबईची शान म्हणून ओळख असलेलं महालक्ष्मी रेस कोर्स हलविण्यासाठी मुंबई महापालिका आणि नगर विकास विभागाकडून पर्यायी जागांचा विचार सुरू आहे. रेस कोर्ससाठी मुलुंड डम्पिंग ग्राउंड नंतर आता खारघर आणि उरण मधील सिडकोच्या जागेचा विचार करण्यात येत आहे.
मुंबई (Mumbai) महापालिकेला महालक्ष्मी येथील रेस कोर्स जागेवर थीम पार्क उभारण्याचा विचार करत आहेत त्यामुळे महालक्ष्मी रेस कोर्स जागा पूर्ण आपल्या मालकीची व्हावी, यासाठी राज्य सरकारला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला आहे.
मात्र, महालक्ष्मी रेस कोर्सच्या जागेत जर थीम पार्क साकारायचा असेल, तर मग रेस कोर्स साठी पर्यायी जागा कोणती? याचा विचार मुंबई महापालिका (BMC) आणि नगर विकास विभाग करत आहे.
याआधी मुलुंड डम्पिंग ग्राउंड परिसरातील जागेचा विचार करण्यात आला. मात्र ही जागा व्यवहार्य नसल्याचं समोर आलं. कारण मुलुंडच्या जागेवर जर रेसकोर्स साकारायचं असेल तर त्यासाठी मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या आसपासची खाजगी मालकीची जागा विकत घ्यावी लागणार आहे आणि त्याला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध आहे.
त्यामुळे आता मुंबई बाहेरील उरण आणि खारघर मधील सिडकोच्या जागेचा विचार रेस कोर्ससाठी करण्यात येत असल्याची माहिती आहे. शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू ( मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ) काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या सागरी सेतू वर वाहतूक सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे
त्यामुळे हा सागरी सेतू वाहतुकीसाठी सुरू झाल्यास मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतील आणि मुंबईकरांना रेस कोर्स उरण किंवा खारघर सिडकोच्या जागेत झाल्यास सहज ये जा करणे शक्य होऊ शकते, असा विचार केला जातोय. मात्र हे सगळे पर्याय विचाराधीन असून कुठलाही प्रकारचा निर्णय झालेला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.