'त्या' १३५ मशिदींवर कारवाई करणार का?; राज ठाकरेंचा पोलिसांना सवाल

ज्या मशिदींवर भोंगा सुरु असेल त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावणार असा इशारा दिला होता.
'त्या' १३५ मशिदींवर कारवाई करणार का?; राज ठाकरेंचा पोलिसांना सवाल
Raj Thackeray Press Conference On LoudspeakerSaam Tv

मुंबई: मनसेने (MNS) आज भोंग्याविरोधात राज्यात आंदोलन सुरु केले आहे. ४ मेपासून ज्या मशिदीवर भोंगा सुरु असेल त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावणार असा इशारा दिला होता. दरम्यान आज राज्यातील अनेक मशिदींमध्ये सकाळची अजान ही भोंग्याविनाच झाली. तर ज्याठिकाणी मशिदींवरील भोंग्यावर अजान झाली त्याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्पीकरवर हनुमान चालीसा लावली. यापार्श्वभूमीवर राज्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली. मुंबईत १३५ अनधिकृत मशिदींवर भोंगे लावले त्यावर पोलीस कारवाई करणार आहेत का?, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. (Raj Thackeray Press Conference On Loudspeaker)

४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होतं. आज मनसेने दिलेला तो अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने राज्यभरात मनसेचं (MNS) आंदोलन सुरु आहे. यादरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

Raj Thackeray Press Conference On Loudspeaker
Nashik: 'सदावर्ते झाले आता राज ठाकरे आलेत, वाट लावणार सगळ्या महाराष्ट्राची'

१३५ मशिदींवर कारवाई होणार का?

'राज्यात ९० ते ९२ टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. आमची लोकं तयारच होती. पण मी खासकरून ज्या मशिदींमध्ये मौलवी असतील त्यांचे आभार मानेन. आमचा विषय त्यांना नीट समजला, असंही ठाकरे म्हणाले. भोंग्याविषयी मुंबईचा अहवाल आला आहे. त्याप्रमाणे मुंबईत ११४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींवर सकाळची अजान पाचच्या आत लावली आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचा काल मला फोन आला होता. सर्व मौलवींशी बोललो आहोत, कुणी अजान लावणार नाहीत, असे त्यांनी सांगितले होते. ज्या मशिदीवर अजान झाली, त्यांच्यावर राज्य सरकार काय कारवाई करणार आहे का, की आमच्याच लोकांना ताब्यात घेणार आहेत, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोलिसांना केला. (Raj Thackeray Press Conference On Loudspeaker)

मनसैनिकांची धरपकड कशासाठी?

भोंग्याचा विषय हा एका दिवसाचा नाही. जिकडे लाऊडस्पीकर लागतील, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजणार आहे. ३६५ दिवस चार-पाच वेळा लाऊडस्पीकरवर ऐकवत असाल तर आम्हाला ते ऐकायचं नाही. महिला, विद्यार्थी आजारी व्यक्तींना याचा त्रास होतो. यांचा धर्म मोठा आहे का माणुसकीपेक्षा, असंही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

पोलिसांनी (Police) भोंगे उतरवले पाहिजेत. भोंग्याचे आवाज बंद झाले पाहिजेत. हा विषय एक दिवसाचा नाही. हा कायमस्वरूपी राहणार आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कशासाठी अटक करत आहात. जे अनधिकृत भोंगे लावत आहेत त्यांना अटक करा मनसैनिकांना कशीसाठी करत आहात, असा सवालही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. (Raj Thackeray Press Conference On Loudspeaker)

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.